मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नीट विचार करून घ्या apple smartwatch; रिपेयरिंगची किंमत वाचून फुटेल घाम

नीट विचार करून घ्या apple smartwatch; रिपेयरिंगची किंमत वाचून फुटेल घाम

बाजारात असं घड्याळ आलं आहे जे रिपेर करणं देखील विकत घेण्याइतकंच महाग आहे. काय आहे या घडाळ्यात इतकं जाणून घ्या.

बाजारात असं घड्याळ आलं आहे जे रिपेर करणं देखील विकत घेण्याइतकंच महाग आहे. काय आहे या घडाळ्यात इतकं जाणून घ्या.

बाजारात असं घड्याळ आलं आहे जे रिपेर करणं देखील विकत घेण्याइतकंच महाग आहे. काय आहे या घडाळ्यात इतकं जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 सप्टेंबर : तंत्रज्ञानाने माणसाचं दैनंदिन जगणं काही प्रमाणात सोपं केलंय. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपन्या बाजारात विविध प्रकारची गॅजेट्स आणतात. त्यात स्मार्ट मोबाईल फोन्सपासून ते स्मार्ट वॉचेसचाही समावेश असतो. अ‍ॅपल या आयफोन बनवणार्‍या प्रसिद्ध कंपनीने काही दिवसांपूर्वी आयफोन 14 ही नवी सीरिज बाजारात उपलब्ध करून दिली आहे. आयफोन प्रेमींसाठी ही आनंदांचीच बातमी आहे, पण अ‍ॅपलने फोन सोबतच वॉचच्या कॅटेगरीत ग्राहकांसाठी तीन स्मार्टवॉच सादर केली आहेत. ज्यामध्ये न्यू अ‍ॅपल वॉच एसई, (New Apple Watch SE), अ‍ॅपल वॉच सीरिज 8(Apple Watch Series 8) आणि अ‍ॅपल वॉच अल्ट्रा (Apple Watch Ultra) अशी तीन स्मार्टवॉच आहेत. अल्ट्रा हे अतिशय दर्जेदार स्मार्टवॉच असून, ते महागही आहे. हे घड्याळ घेण्यासाठी तुम्हाला भारतात 89,000 रुपये मोजावे लागतील. तसंच हे घड्याळ बिघडलं तर दुरुस्तीचा खर्चही तसाच दणकेबाज असणारे.

अल्ट्रा हे घड्याळ भारतात विक्रिसाठी उपलब्ध झालं त्याचं शिपिंग 23 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल. पण या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट ही की, जर हे वॉच तुमच्या हातून तुटलं किंवा काही कारणाने त्यात बिघाड झाला तर तुम्हाला ते दुरूस्त करणं नक्कीच कठीण होणार आहे. कारण, यासाठी ग्राहकांना दुरुस्तीसाठी तब्बल 43 हजार रुपये मोजावे लागतील.

हेही वाचा - Tecno Smartphone: चक्क रंग बदलणारा स्मार्टफोन 3 दिवसांनी होणार लाँच, झक्कास फीचर्स, किंमतही कमी

अ‍ॅपल कंपनीने चीनमध्ये या वॉचच्या दुरूस्तीसाठी येणार्‍या खर्चाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. याबद्दल अ‍ॅपल कंपनीने जी घोषणा केली आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, चीनमध्ये अ‍ॅपल कंपनीचं हे वॉच दुरुस्त करायचं असेल तर CNY 3,749 इतका खर्च येईल. म्हणजे भारतीय ग्राहकांना 43,113 रुपये मोजावे लागतील. इतकी भली मोठी रक्कम ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असणार यात शंका नाही. पण यात महत्त्वाची गोष्ट ही की जर तुम्ही अ‍ॅपल कंपनीचे ग्राहक म्हणून Apple Care+ Subscription घेतलं असेल, तर दुरुस्तीचा चीनमधील खर्च CNY 588 इतका तर भारतात तो 6,762 रूपये इतकाच असेल. हा लाभ घ्यायचा असल्यास ग्राहकांनी Apple Care+ Subscription घेणं आवश्यक आहे.

अ‍ॅपल कंपनीने या वॉच अल्ट्रा गॅजेटच्या दुरूस्तीच्या येणार्‍या खर्चाबद्दलची घोषणा ही केवळ चीनमध्ये केली आली असून, इतर कुठल्याही देशात याबद्दल अ‍ॅपल कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, भारतीय ग्राहकांना जर Apple Care+ Subscription चा लाभ घ्यायचा असेल किंवा या ग्रुपचे सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी 10,900 रुपये मोजावे लागतील. स्टीव्ह जॉब्ज (Steve Jobs) यांनी स्थापन केलेल्या अ‍ॅपल कंपनीने आयफोन आणि आयपॉडच्या साहाय्याने जगभरात आपले जाळे पसरवले आहे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणूस विकासाकडे कशी आगेकूच करत आहे हेच दाखवले आहे.

First published:

Tags: Apple, Tech news