बुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव!

बुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव!

पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला अॅपलच्या स्मार्ट वॉचमुळे पोलिसांनी आपत्कालिन पथकाने वाचवलं.

  • Share this:

शिकागो, 16 जुलै : अॅपल वॉचमुळे जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील शिकागोत एक व्यक्ती अॅपलच्या स्मार्ट वॉचमुळं बुडण्यापासून वाचली. याबाबत तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लिप एशो नावाची व्यक्ती शिकागोत स्कायलाइनचे फोटो काढण्यासाठी एका बोटीतून जात होता. त्यावेळी मोठ्या लाटेमुळे लिप एशो पाण्यात पडला.

शिकागोतील लिप एशोजवळ असलेला मोबाईलसुद्धा पाण्यात पडला. एशोने नावेतील लोकांना मदतीसाठी हाक मारली. मात्र, त्याचा आवाज त्या लोकांपर्यंत पोहचला नाही. त्यावेळी लाटांच्या तडाख्याने तो पाण्यात बुडत होता.

पाण्यात बुडत असतानाच एशोनं स्मार्ट वॉचमध्ये असलेल्या फिचरचा वापर केला. त्याने सोफिसटिकेटेड ऑपरेटिंग सिस्टिमच्या (SOS) मदतीने आपत्कालिन नंबरवर कॉल केला. त्यानंतर लगेच शिकागोचे पोलिस आणि फायर बोटसह एक हेलिकॉप्टर आले. त्यानंतर एशोला सुरक्षित बाहेर काढण्यातच आलं. एशोनं त्याचा जीव वाचण्याचं श्रेय स्मार्टवॉचला दिलं आहे.

कोणताही युजर जेव्हा SOS कॉल करतो तेव्हा अॅपल वॉच अॅटोमॅटीक स्थानिक आपत्कालिन नंबरवर कॉल करते. काही देशांमध्ये आणि भागात युजर्स त्यांच्या गरजेनुसार ही सेवा निवडतात.

अॅपल वॉचने जीव वाचवण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अमेरिकेच्या एका व्यक्तीचा जीव वाचवला होता. अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये डॉक्टरने त्याच्या स्मार्टवॉचच्या मदतीनं एका व्यक्तीच्या शरीरात आर्टरी फायब्रिलेशनची असल्याचं शोधलं होतं.

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

First published: July 16, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading