मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple च्या भारतातील ग्राहकांसाठी खूशखबर! कंपनीचे CEO टिम कुक यांनी केली मोठी घोषणा

Apple च्या भारतातील ग्राहकांसाठी खूशखबर! कंपनीचे CEO टिम कुक यांनी केली मोठी घोषणा

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या शेअर होल्डर्सच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या शेअर होल्डर्सच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या शेअर होल्डर्सच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या शेअर होल्डर्सच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. लवकरच अॅपलकडून भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यात येतील. कुक म्हणाले की, यासाठी सरकारने आम्हाला मंजुरी द्यावी. भारतात त्यांचा उद्योग इतर कोणाच्या हातात सोपवायचा नाही.

भारत सरकारकडून अद्याप अॅपलला परवानगी मिळालेली नाही. आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच मंजुरी मिळेल असंही टिम कुक म्हणाले.

अॅपलने भारतात ऑनलाइन स्टोअर उघडलं तर त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. काउंटर पॉइंट रिसर्चच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू केल्यानंतर अॅपल फक्त आयफोनपुरतं मर्यादित राहणार नाही. भारतात युजर्सच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर ऑनलाइन उलाढाल मोठी आहे. अॅपलचं ऑनलाइन स्टोअर सुरु झाल्यानतंर ग्राहकांना कंपनीची सर्व प्रोडक्ट्स एकाच ठिकाणी मिळतील. यामुळे कंपनीला त्यांचा विस्तार करणं शक्य होईल.

वाचा : अगदी कमी किंमतीत वापरा 3 कॅमेराचा फोन, 'या' फोनमध्ये आहेत नवे फीचर

सध्या अॅपल त्यांचे प्रोडक्ट अॅमेझॉन आणि फ्लिककार्टच्या माध्यमातून विकते. यामुळे कंपनीला त्यांच्या उत्पन्नातील काही भाग त्या कंपन्यांना द्यावा लागतो. जर अॅपलने भारतात ऑनलाइन स्टोअर सुरु केलं तर त्यांना इतरांना पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच ग्राहकांना एकाच जागी सर्व सेवा मिळतील.

वाचा : Android स्मार्टफोन वापरताय सावधान! तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप नाहीत ना?

वाचा : Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

First published:

Tags: Apple, Iphone