मुंबई, जून 26 : स्मार्ट वॉचची सध्या बाजारात खूप मागणी आहे. अॅपलच्या मागोमाग अनेक कंपन्यांचं स्मार्ट वॉच आले. या स्मार्ट वॉचमध्ये अनेक फिचर दिले जातात. रोज पायी किती चाललात, तुम्ही कोणत्या लोकेशनवर आहात, कोणते अॅप वापरतात या सगळ्याची माहिती या स्मार्ट वॉचमध्ये असते. एवढंच नाही तर तुमच्या आरोग्याची काळजीही हे घड्याळ घेतं. तुमच्या हृदयाचे ठोके आणि त्याविषयीची माहिती यात मिळते. अॅपल वॉचमधील याच फिचरमुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. तंत्रज्ञानाच्या तोट्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमीच येत असतात मात्र, यावेळी चित्र उलट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत एका हॉटेलमध्ये डॉक्टरने त्याच्याकडे असलेल्या 'अॅपल वॉच सीरिज 4' च्या मदतीने एका माणसाच्या शरीरातील आर्टरी फाइब्रिलेशनची (AF or A-fib) माहिती काढली व त्याचा जीव वाचवला. आर्टरी फाइब्रिलेशनला मेडिकल भाषेत ए- फिब किंवा एफ असंही म्हटलं जातं. आर्टरी फाइब्रिलेशनची ही हृदयाची एक गंभीर स्थिती आहे. यावर तात्काळ असा उपाय करता येत नाही. पण याकडे दुर्लक्ष केले तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याची लक्षणं अनेकांना माहीत नसल्याने आपल्याला नेमकं काय होतंय हे कळतंच नाही. मात्र अॅपल वॉचमध्ये असणाऱ्या 'इर्रेगुलर रिद्म नोटिफिकेशन' या फीचरच्या मदतीने हृदयाचे ठोके आणि त्याची हालचाल जाणून घेऊ शकतो. हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमीत बदलाचे कारण A-फिब आहे की नाही हे अॅपल वॉच सीरिज 4 च्या नोटिफिकेशनमुळे कळते.
(वाचाः तुमच्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्समध्ये होणार 'हा' मोठा बदल)
कॅलिफोर्नियामधील सॅन डियागो येथील डॉक्टरने या घडाळ्याबद्दल ट्वीट करत म्हटलं की, 'एक फिजीशियन असल्याने, आजाराची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक जागांवर ECG मशीन लवकर शोधण्यापेक्षा, माझ्या अॅपल वॉच सीरिज 4 ला कोणाच्याही हातावर बांधून आजाराचं कारण शोधता येईल."
As a physician, it’s much faster to put my #applewatch4 on someone else’s wrist to detect ❤️ disease (A. fib) than finding a ECG machine at a public restaurant! 😀 (Indeed, a true #mhealth guardian) pic.twitter.com/JLVD4JUYI9
— Tommy Korn MD (@TommyKornMD) June 21, 2019
सध्या अमेरिका, युरोप आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये या घडाळ्याला प्रचंड मागणी आहे. या घडाळ्याचा उपयोग करून कोणीही त्यांच्या हृदयाचे ठोके संथ होत आहेत की जलद याचा अंदाज लावू शकतात. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी ECG मशीन शोधण्याची गरजच उरली नाही. भारतीयांना हे घड्याळ घेण्यासाठी मात्र काही काळ थांबावं लागणार आहे. कारण अॅपल वॉचमध्ये आरोग्याची माहिती देणारं हे फिचर सध्या भारतात उपलब्ध नाही.
(वाचाः WhatsApp मध्ये होतोय मोठा बदल, आता मिळेल 'हे' फीचर)
याआधीही अॅपल वॉचने वाचला आहे जीव
याआधीही जर्मनीमध्ये राहणाऱ्या 80 वर्षीय महिलेचा जीव अॅपल वॉचमुळे वाचला आहे. त्या महिलेचा तोल जाणार असल्याचं घडाळ्याला कळलं आणि त्याने तात्काळ 112 वर फोन केला आणि अगदी थोड्याच वेळात बचाव पथक तिथे पोहोचलं आणि त्या महिलेचा जीव वाचला. म्यूनिकच्या फायर डिपार्टमेंटने याविषयी माहिती दिली असता, ज्यावेळी महिला पडणार होती तेव्हा तिच्या जवळील घड्याळातील फॉल डिटेक्शन सिस्टम सक्रिय झाली. जशी ती पडली लगेच या सिस्टमने 112 या आपतकालीन नंबरवर फोन फिरवला आणि महिला पडल्याची माहिती दिली.
दाभोलकर हत्येप्रकरणी मोठा खुलासा; सीबीआयकडून विशेष कोर्टात अहवाल सादर