Home /News /technology /

Apple म्हणतंय 'Facebook ने पुन्हा ऐकावं, आमचा डिजीटल जाहिरातींना विरोध नाही'

Apple म्हणतंय 'Facebook ने पुन्हा ऐकावं, आमचा डिजीटल जाहिरातींना विरोध नाही'

अॅपलच्या (Apple) आयफोनसाठी आयओएस 14.5 अपडेट कोणत्याही क्षणी येऊ शकतं. यामध्ये बहुप्रतिक्षित अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी फिचर (App Tracking Transparency Feature) हे वैशिष्ट्य असेल.

मुंबई, 14 एप्रिल : अॅपलच्या (Apple) आयफोनसाठी आयओएस 14.5 अपडेट कोणत्याही क्षणी येऊ शकतं. यामध्ये बहुप्रतिक्षित अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी फिचर (App Tracking Transparency Feature) हे वैशिष्ट्य असेल. हे एक प्रायव्हसी फिचर असेल. युझर्स कोणते अॅप्स वापरतात, त्यांची वेबसाईट आणि अॅप्ससाठी डेटा वापरण्याची सवय कशी आहे, हे पाहून तशा ऑफर्स आणि जाहिराती करण्याचं काम या फिचर मार्फत होईल. परंतु हे सर्व ट्रॅकिंग युझर्सच्या संमतीशिवाय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी टोरांटो टाईम्सशी याबाबत बोलताना सांगितले की ज्यावेळी युझर्ससाठी तातडीची परिस्थिती निर्माण होईल,तेव्हा अॅपल आपल्या युझर्सची ऑनलाईन गोपनीयता संरक्षित करण्यासाठी पुढे येईल. तसेच अॅपलने सोशल मिडीया नेटवर्क असलेल्या फेसबुकच्या (Facebook) टीकेला उत्तर दिले. त्यांचा असा आग्रह आहे की युझर्सला अधिक ट्रॅकिंग कंट्रोल (Tracing Control)दिला तर ऑनलाईन जाहिरातींवर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना त्रास होईल, असे अॅपलने म्हटलं आहे. प्रायव्हसीबाबत टीम कूक म्हणाले की, 'प्रायव्हसी (Privacy)हा एक प्रमुख मानवी अधिकार आहे. आम्ही हे देखील जाणतो की तुमच्या घरातील व्यक्तींकडे तुमच्याविषयी जितकी माहिती असते त्यापेक्षा तुमच्याविषयीची जास्त माहिती तुमच्या फोनमध्ये असते. ज्या गोष्टींचा युझर्स विचार करतात, त्याच गोष्टी ते फोनवरुन सर्च करत असतात. त्यामुळे युझर्सच्या फोनमध्ये त्या अनुषंगानेच माहिती असते. युझर्सचा बॅंक तपशील, आरोग्या विषयीचा तपशील, मित्र, व्यवसायातील सहकारी किंवा कुटुंबियांसमवेत केलेले कॉन्व्हरसेशन आदी सर्व माहिती फोनमध्ये असते. त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून युझर्सला मदत करण्याची आमची भावना आहे. डिजीटल जाहिरातींचा (Digital Advertisement)व्यवसाय कसा केला जातो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. यात वैयक्तिक जाहिरातींपूर्वी युझर्सचा वैयक्तिक डेटा आणि वापर याचे संकलन केले जाते.' लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाबद्दल मनमाडमधून आली धक्कादायक बातमी! आतापर्यंत आपण आपल्या फोनवर आपल्या संमतीनं ब्राऊझिंग किंवा शॉपिंग करताना इंटरनेटच्या कक्षेबाहेरुन आपल्याला कोणी ट्रॅक करीत आहे का, हे तपासण्याचे कोणतेही साधन नव्हते.  अॅपल अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी फिचरमध्ये प्रॉक्टर ऍण्ड गॅम्बल,फेसबुक तसेच सोशल मिडीया नेटवर्क असलेल्या इन्स्टाग्रामचाही समावेश आहे, असे निरीक्षण टीम कूक यांनी नोंदवले आहे. आम्ही डिजीटल जाहिरातींच्या विरोधात नाही, असे नमूद करत कूक म्हणतात की लोक बहुतांश वेळ ऑनलाईन गोष्टींवर खर्च करतात. त्या तुलनेने टीव्हीवर कमी वेळ खर्च होतो. त्यामुळे डिजीटल जाहिरातींच्या माध्यमातून अधिकाधिक भरभराट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत डिजीटल जाहिरातीच यशस्वी ठरु शकणार आहेत. तर मग माझा प्रश्न असा आहे की आम्ही परवानगीशिवाय प्रोफाईल बिल्डींगला परवानगी का द्यावी,असा सवाल कूक यांनी विचारला. अॅप ट्रकींग ट्रान्सपरन्सी फिचर हे तुमच्या आयफोनमध्ये एखादे अॅप प्रथम सुरु केल्यानंतर किंवा एखादे अॅप तुम्ही अपडेट केल्यानंतर तुम्हाला विचारते की एक्सवायझेडला किंवा इतर कंपन्यांच्या अॅप्सला आणि वेबसाईटला आपली अॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्याची परवानगी द्यायची का. या टप्प्यावर तुमच्याकडं दोनच पर्याय असतात,एक अॅपला ट्रॅक न करण्यास सांगा किंवा परवानगी द्या.

कोरोनाचा फटका बॉलिवूडला; लॉकडाउनमुळं 15 दिवस शूटिंग राहणार बंद

द अप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी फिचर हे तुमच्या फोनमधील सेंटिंगमधील प्रायव्हसी मेनूत(Privacy Menu)समाविष्ट असेल. आयफोन युझर्स हे त्यांच्या ब्राऊझिंग अॅप आणि अॅप युझेस ट्रेंडचा मागोवा घेण्यासाठी परवानगी देऊ किंवा नाकारु शकतात. प्रकटीकरण किंवा निवड अशी सोपी कल्पना यामागे आहे. आपण येथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे,अॅपल हा तुमचा डाटा ट्रॅकिंग (Data Tracking)करीत नाही. तसेच अॅपल वैयक्तिक जाहिराती थांबवत नाही. दुसरे म्हणजे,अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर जे फ्रि रन अॅप्स युझर्सच्या वापरण्याच्या पध्दती, तसेच ब्राऊझिंग ट्रॅकिंग कोणतीही परवानगी न घेता करीत होते, असे अॅप्स आणि वेबसाईट प्लॅटफार्मची सेवा अॅपल आता बंद करीत आहे. त्यामुळे येथून पुढे जर कोणत्याही अॅप्स किंवा वेब प्लॅटफॉर्मला असे करायचे असेल तर त्यांना पूर्व परवानगी घेणं अनिवार्य आहे. अनेक युझर्स असे करण्यास परवानगी देत नसल्याची भीती विविध ब्रॅण्डसनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑनलाईन जाहिरातींसाठी काम करणाऱ्यांना पुरेसा डेटा उपलब्ध होणार नाही आणि त्यांना विपुल प्रमाणात आणि बरीच वर्षे डेटा मिळणार नाही.
First published:

Tags: Apple, Facebook

पुढील बातम्या