Home /News /technology /

चिनच्या Gaming Industryला Appleचा मोठा धक्का, हटवले 30 हजार Apps

चिनच्या Gaming Industryला Appleचा मोठा धक्का, हटवले 30 हजार Apps

कोरोनामुळे चीनच्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला आहे.

    बीजिंग 2 ऑगस्ट: जगातली सर्वात मोठी फोन उत्पादक कंपनी असलेल्या Appleने चिनच्या Gaming Industryला मोठा धक्का दिला आहे. Appleने चिनी App स्टोअर असलेल्या iOS Storeमधून तब्बल 29,800पेक्षा जास्त Apps हटवले आहेत. हे Apps घेतांना स्थिनि कंपन्यांनी लायसन्स घेतलेलं नव्हतं. चीनमध्ये असलेल्या नियमांनुसार असं लायसन्स घेणं आवश्यक आहे मात्र ते घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. Appleने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनची रिसर्च फर्म असलेल्या Qimaiने आपल्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे. हटविण्यात आलेल्या Appsमध्ये बहुतांश Appsहे गेमिंगशी संबंधित आहेत. जगातल्या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये चीनचा वरचष्मा असून त्यातून कोट्यवधींची कमाई चीन करत असतो. असे Apps घेण्यासाठी स्थानिक स्तरावरही चीनमध्ये कडक कायदे आहेत. संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये यासाठी अशा नियम असल्याचं सांगितलं जातं. या नियमांना अनुसरूनच Appleने ही कारवाई केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच Appleने याबाबत सगळ्या कंपन्यांना सूचना केली होती. मात्र त्याचं पालन झालं नसल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. रक्षाबंधनानिमित्तानं देऊ शकता खास गिफ्ट! ! 10 हजारपेक्षा स्वस्त आहेत 10 मोबाईल कोरोनामुळे चीनच्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला आहे. तर अनेक उद्योगांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त मजूर आणि उद्योग स्नेही वातावरण यामुळे चीनमध्ये जगभरातले बडे उद्योग आपलं उत्पादन तयार करतात. मात्र कोरोनामुळे कुठल्याही एकाच देशावर अवलंबून राहण्यास आता हे उद्योग तयार नाहीत. PHOTOS: तुमच्या Whatsapp च्या चॅटिंग विंडोमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या त्यामळेच Appleने काही दिवसांपूर्वी चेन्नईत आपल्या महागड्या iPhone 11चं उत्पादन सुरु केलं आहे. तर अनेक उद्योगांनी आता भारताला पसंती दिली आहे. त्यामुळे चीनने आता उद्योगांसाठी अनेक घोषणा करत त्यांचा थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या