मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple कडून MacBook Air, MacBook Pro आणि Mac Mini लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Apple कडून MacBook Air, MacBook Pro आणि Mac Mini लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ॲपलने (Apple) यावर्षी  ‘One More Thing’ च्या चौथ्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपला पहिला सिलिकॉन चीप सेट M1 लाँच केला आहे. कंपनीची ही सर्व डिव्हाईस M1 चिपसेटने सुसज्ज आहेत.

ॲपलने (Apple) यावर्षी ‘One More Thing’ च्या चौथ्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपला पहिला सिलिकॉन चीप सेट M1 लाँच केला आहे. कंपनीची ही सर्व डिव्हाईस M1 चिपसेटने सुसज्ज आहेत.

ॲपलने (Apple) यावर्षी ‘One More Thing’ च्या चौथ्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपला पहिला सिलिकॉन चीप सेट M1 लाँच केला आहे. कंपनीची ही सर्व डिव्हाईस M1 चिपसेटने सुसज्ज आहेत.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : ॲपलने (Apple) यावर्षी ‘One More Thing’ च्या चौथ्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपला पहिला सिलिकॉन चीप सेट M1 लाँच केला आहे. ॲपलचा वन मोअर थिंग हा प्रोग्राम मंगळवारी रात्री भारतीय वेळेनुसार 11:30 वाजता सुरू झाला. ॲपलने आपल्या प्रोग्राममध्ये नवीन मॅकबुक, मॅकबुक प्रो आणि मॅक मिनी देखील बाजारात आणला आहे. यातील खास बाब म्हणजे कंपनीची ही सर्व डिव्हाईस M1 चिपसेटने सुसज्ज आहेत.

M1 चिपसेट (M1 Chipset)

ॲपलने मॅकसाठी घोषणा केलेल्या त्यांच्या प्रोसेसरचं नाव M1 आहे. नवीन ARM बेस ॲपल सिलीकॉन प्रोसेसर हा पॉवर-पर-वॉट फोकस्ड आहेत. तसंच M1 ही बाजारातील सर्वात प्रभावी चिप असल्याचा दावा ॲपल कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये 8 कोअर सीपीयू आहेत जे चार हाय एफिशिएन्सी कोर्ससोबत येतात.

हा 5 नॅनोमीटर प्रोसेसरवर आधारित आहे. ॲपलने डिझाईन केलेला ग्राफिक्स प्रोसेसर याच्यात इंटिग्रेट केलेले आहेत. टेक कंपनीने असं म्हटलं आहे की, डेव्हलपर्स असे ॲप्स बनवू शकतात त्यामुळे इंटेल बेस्ड आणि M1 बेस्ड डिव्हाइस मॅकसोबत काम करू शकतात.

मॅक बुक एअर (MacBook Air)

ॲपलने आपल्या कार्यक्रमात मॅक बुक एअर 2020 देखील बाजारात आणला आहे. M1 चिपसेटसह येणारा हा कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. मॅक बुकची किंमत ही यूएस मध्ये 999 डॉलर आहे, ज्याची अंदाजे किंमत 92,900 रुपये इतकी आहे. मॅक बुक एअरची बॅटरी लाइफ 18 तास आहे. याआधीच्या लॅपटॉपपेक्षा याची बॅटरी सहा तास जास्त चालते.

(वाचा - या ई-कॉमर्स साईटच्या 2 कोटी युजर्सचा डेटा लीक;30 लाख रुपयात विक्रीची माहिती)

मॅक बुक प्रो (MacBook Pro)

ॲपलने आपल्या या कार्यक्रमात मॅकबुक एअरसोबत आपला मॅक बुक प्रो देखील बाजारात आणला आहे. अमेरिकेत त्याची किंमत 1,299 डॉलर आहे, ज्याची अंदाजे किंमत 1,22,900 रुपये आहे. यात M1 चिप्ससह 6 तासाची बॅटरी लाइफ आणि 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देण्यात आला आहे. हा मॅकवरील सर्वांत जास्त बॅटरी लाईफ असणारा लॅपटॉप आहे. नवीन मॅक बुक प्रोमध्ये 2 यूएसबी पोर्ट असून ते यूएसबी थंडर बोर्ड 4 ला सपोर्ट करतात. ॲपलने म्हटलंय की, त्याचे 8 कोअर सीपीयू हे मागील जनरेशनच्या 13 इंचाच्या मॅक बुक प्रो पेक्षा 2.8 पट जास्त वेगाने काम करतात.

मॅक मिनी (Mac Mini)

ॲपलचा आणखी एक नवा हार्डवेअर म्हणजे, कंपनीने मॅक मिनी देखील बाजारात आणला असल्याचं सांगितलं. मॅक मिनीची किंमत अमेरिकेत 699 डॉलर आहे, ज्याची अंदाजे किंमत 64,900 रुपये आहे.

(वाचा - घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी देतंय YouTube! वाचा काय आहे प्रक्रिया)

युएसमधील ग्राहकांसाठी आजपासून मॅकबुक प्रो, मॅकबुक एअर आणि मॅक मिनीचं बुकिंग सुरू होणार आहे. पुढील आठवड्यापासून ते बाजारात उपलब्ध होतील. ॲपलने प्रथमच स्वतःच्या प्रोसेसरवर आधारित मॅक लॅपटॉप बाजारात आणले आहेत. सप्टेंबरमधील इव्हेंटमध्ये Apple ने आयपॅड आणि वॉच लाँच केलं होतं. त्यावेळी आयफोन 12 सुद्धा लाँच करण्यात आला होता. आता ॲपल आपल्या नवीन लॅपटॉपसह बाजारात पुन्हा एकदा चर्चेत आहे.

First published:

Tags: Apple, Iphone