'या' टेस्टही तुमच्या हातात; Apple चं नवं Smartwatch आणखी स्मार्ट होणार

'या' टेस्टही तुमच्या हातात; Apple चं नवं Smartwatch आणखी स्मार्ट होणार

Apple आता आधीपासूनच अनेक फीचर्ससह असलेल्या आपल्या स्मार्टवॉचला आता आणखी स्मार्ट करणार आहे. अ‍ॅपल कंपनी आपल्या स्मार्टवॉचमध्ये आता आणखी काही हेल्थ फीचर्स देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : संपूर्ण जगभरात Apple आपल्या खास टेक्नोलॉजीसाठी ओळखला जातो. मोबाईल (iPhone), डेस्कटॉप (Desktop) नंतर स्मार्टवॉच (Smart watch) आणून जगभरात घड्याळाबाबतची परिभाषाच बदलली गेली. केवळ वेळ दाखवणारं घड्याळ इतक्या गोष्टींसाठी कामाला येईल, असा कोणी विचारही केला नसेल. Apple आता आधीपासूनच अनेक फीचर्ससह असलेल्या आपल्या स्मार्टवॉचला आता आणखी स्मार्ट करणार आहे. अ‍ॅपल कंपनी आपल्या स्मार्टवॉचमध्ये आता आणखी काही हेल्थ फीचर्स देणार आहे.

ब्लड प्रेशर आणि शुगर टेस्ट -

अ‍ॅपल येणाऱ्या काळात आपल्या स्मार्टवॉचमध्ये ब्लड प्रेशर (blood pressure) आणि शुगर टेस्ट (sugar test) करण्यासाठीचे फीचर्स देवू शकतो. फेब्रुवारीमध्ये अमेरिकी पेटेंट आणि ट्रेड मार्क ऑफिसमध्ये अ‍ॅपलद्वारे करण्यात आलेल्या एका पेटेंटने हा खुलासा झाला आहे. आगामी काळात येणाऱ्या स्मार्टवॉचमध्ये Alcohol test करण्याचंही फीचर असू शकतं. 2023 पर्यंत अ‍ॅपल हे वॉच बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

(वाचा -Coronavirus: पल्स Oximeter खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

हार्डवेअर -

ब्लड प्रेशर आणि शुगर टेस्ट या गोष्टी केवळ सॉफ्टवेअरच्या मदतीने केल्या जाऊ शकत नाही. यासाठी अ‍ॅपल हार्डवेअरही ऑफर करू शकतं. टेलीग्राफमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, हेल्थ टेक कंपनी रॉकली फोटोनिक्सनेही याबाबत इशारा दिला आहे. परंतु अ‍ॅपलने या लाँचबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

(वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

स्मार्ट गॅजेट्स -

स्मार्ट गॅजेट्सचा ट्रेंड संपूर्ण जगभरात वाढतो आहे. कोरोनानंतर तर हेल्थ गॅजेट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक स्मार्ट डिव्हाईसद्वारे ईसीजी, पल्स रेट, हार्ट बीट मॉनिटरिंग यासारख्या गोष्टी लोक घरी बसून करू शकतात. त्यामुळेच अ‍ॅपलसह अनेक कंपन्या आपलं स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड लाँच करत आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: May 4, 2021, 11:27 PM IST

ताज्या बातम्या