Googleचा सामना करण्यासाठी आता Appleही आणणार सर्च इंजिन?

Googleचा सामना करण्यासाठी आता Appleही आणणार सर्च इंजिन?

गुगल आणि Appleमधला हा करार आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे स्वत:चं सर्च इंजिन तयार करण्यासाठी Appleने कंबर कसल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

न्ययॉर्क 28 ऑगस्ट: गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र त्यांचा फार काळ टीकाव लागू शकला नाही. त्यामुळे बाजारपेठेवर आता गुगलचं वर्चस्व असून जगातल्या लोकांचा महाप्रचंड असा डेटा गुगलकडे आहे. आता टेक जगतात आघाडीवर असलेली Apple ही कंपनीही आता आपलं सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे.

यावर Appleने अधिकृत काहीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी याबाबत कंपनीच्या काही निर्णयावरून हा अंदाज  लावला जात आहे. टेक जगतात आघीडीच्या समजल्या जाणाऱ्या Coywolf या वेबसाईटने याबाबतचा एक रिपोर्ट दिला आहे. त्यात हे संकेत देण्यात आले आहेत.

गुगल Appleला त्यांच्या iPhone, iPad आणि इतर डिव्हाईसमध्ये डिव्हाईसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये देत असते. गुगल आणि Appleमधला हा करार आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे स्वत:चं सर्च इंजिन तयार करण्यासाठी Appleने कंबर कसल्याचं बोललं जात आहे.

WhatsAppचं नवं फीचर, जाणून घेता येणार फॉरवर्ड केलेला मेसेज खरा की खोटा

यासाठी Apple निष्णात इंजिनिअर्सची भरती करत आहे. त्यामुळे Apple सर्च इंजिन तयार करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, Apple ने भारतात आपल्या स्वस्त आणि सेकंड जनरेशन iPhone SE (2020) ची असेंब्लिंग सुरू केली आहे. यामुळे अनेक आयफोन प्रेमींचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याअंतर्गत अॅपलच्या आयफोनची किंमती कमी होणार असल्याने अनेकांच्या खिशाला ती परवडू शकेल.

आता टाटा ग्रुपही लाँच करणार Super app; एकाच ठिकाणी उपलब्ध होणार सर्व सेवा

कंपनीने सांगितले की फार लवकरच ऑथराइज्ड रिटेल स्टोअर आणि ऑनलाइन चॅनलवर विक्री करण्यासाठी हे आयफोन उपलब्ध होतील. कंपनीने या फोनला मिड-रेंज ऐंड्रॉईड यूजर्संना लक्षात ठेवून भारतात लॉन्च केलं आहे. आयफोन 8 प्रमाणे दिसणाऱ्या या फोनमध्ये आयफोन 11 चे फिचर्स पाहायला मिळतील. कंपनीने भारतात आयफोन SE 2020 ची किंमत 42,500 रुपये ठेवली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 28, 2020, 10:53 PM IST

ताज्या बातम्या