Apple युझर्ससाठी पेमेंटचा नवा पर्याय!

Apple युझर्ससाठी पेमेंटचा नवा पर्याय!

Apple युझर्ससाठी आता खास apple चं क्रेडिट कार्ड. घेता येणार या सुविधांचा लाभ.

  • Share this:

Apple युजर्झ प्रेमींसाठी आता Apple ने एक खास गोष्ट आणली आहे. ज्यामुळे आपल्या फोनमधून आपल्या मित्र-मैत्रिणी, नातलगांना पैसे पाठवणं अधिक सोपं होणार आहे.

अमेरिकेतील क्युपर्टिनो येथे झालेल्या एका शोमध्ये Appleने पेमेंट, मनी ट्रान्सफर करण्यासाठी एक क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. आपल्या फोन युझर्झसाठी त्यांनी खास क्रेडिट कार्ड आणलं आहे.

या क्रेडिट कार्डचं वैशिष्ट्य म्हणजे Apple कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कार्डवर कोणताही नंबर नसेल. याशिवाय कार्डवर सीसीव्ही नंबर अथवा सही नसेल. हे कार्ड तुम्हाला लाईफटाईम वापरता येणार आहे. तुमच्या फोनमध्ये तुम्हाला application डाऊनलोड करुन त्यावर हे कार्ड कनेक्ट करावं लागेल आणि त्या applicationच्या सहाय्यानं तुम्हाला पैसे ट्रान्सफर अथवा केव्हाही कुठेही तुम्हाला पैसे देता येणार आहेत. याशिवाय किती पैसे कुठे, कसे वापरले याची सर्व माहिती आपल्या फोनवर आपल्याला मिळू शकते.ट्रान्सफर केलेले पैसे तुम्ही फोनद्वारे ट्रॅक करु शकता.iOS युझर्सना मात्र ट्रॅक करण्याची सुविधा देण्यात आली नाही.

हे कार्ड मास्टर कार्डपेक्षाही अधिक सुरक्षित आहे असा apple कंपनीने दावा केला आहे.

जे युझर्स या कार्डचा वापर करतील त्यांना पेमेंट केल्यानंतर 2 टक्के कॅशबॅकची सुविधाही appleने दिली आहे. सध्या हे कार्ड फक्त अमेरिकेतील युझर्ससाठी युझरफ्रेंडली करण्यात आलं आहे. मात्र ही सुविधा इतर देशांसाठी कधी सुरू करणार याबाबत apple कंपनीकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

First published: March 26, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading