• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Apple Launch Event 2021: नवा MacBook Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच, AirPods 3 ची भारतात असणार ही किंमत

Apple Launch Event 2021: नवा MacBook Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच, AirPods 3 ची भारतात असणार ही किंमत

Apple ने ऑक्टोबर इव्हेंटमध्ये आपल्या नव्या प्रोडक्टचा खुलासा केला आहे. Apple ने या इव्हेंटमध्ये M1 Pro आणि M1 Max चिप लाँच केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : Apple ने ऑक्टोबर इव्हेंटमध्ये आपल्या नव्या प्रोडक्टचा खुलासा केला आहे. Apple ने या इव्हेंटमध्ये M1 Pro आणि M1 Max चिप लाँच केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Macbook Pro Laptop नव्या जनरेशनसह लाँच करण्यात आला आहे. Macbook Pro नॉचसह 14 इंची आणि 16 इंची वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. काय आहेत फीचर्स - - HDMI पोर्ट, Thunderbolt 4, SD Card आणि एक हेडफोन जॅक देण्यात आला आहे. - MacBook Pro XDR 16.2 इंची डिस्प्लेसह उपलब्ध आहे. - Liquid Retina XDR डिस्प्लेमध्ये मायक्रो LED टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. - MacBook Pro M1 Pro 16 इंची 2.5 टक्क्यांनी अधिक फास्ट आहे. - M1 Pro आणि M1X Max 4 टक्क्यांनी फास्ट आहे. - 14 इंची MacBook Pro CPU परफॉर्मेंसमध्ये 3.7 अधिक फास्ट आहे.

  6 कॅमेरे आणि जबरदस्त प्रोसेसर असणाऱ्या या स्मार्टफोनवर तब्बल 8000 रुपयांची सूट

  MacBook Pro आणि M1 Pro साठी चांगली बॅटरी देण्यात आल्याचा दावा Apple कडून करण्यात आला आहे. 14 इंची MacBook Pro 17 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक दिला जाऊ शकतो. तर 16 इंची MacBook Pro 21 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकतो. मॅकबुक अर्धा तासात 50 टक्क्यांहून अधिक चार्ज केला जाऊ शकतो. 14 इंची MacBook Pro ची किंमत 1,999 डॉलरपासून सुरू होते. तर 16 इंची वेरिएंटची किंमत 2,4999 डॉलरपासून आहे.

  लॉन्च होण्याआधीच Redmi Note 11 ची किंमत लीक, असे असतील जबरदस्त Features

  Airpods - Apple ने या इव्हेंटमध्ये Airpods लाँच केले. हे वायरलेस इयरबड्स कंपनीचे थर्ड जनरेशन ऑडिओ डिव्हाइस आहे. AirPods 3 च्या डिव्हाइसमध्ये खास बदल करण्यात आले आहेत. घाम आणि पाण्यापासून बचाव होण्यासाठी यात IPX4 रेटिंगसह Adaptve EQ आणि Spatial Audio सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 6 तास बॅटरी बॅकअप, इयरबड्स फास्ट चार्जिंग केस सह MagSafe सपोर्टही देण्यात आला आहे. Apple AiPods 3 ची किंमत 179 डॉलर असल्याची घोषणा केली आहे. आजपासून प्री-ऑर्डर सुरू होत असून पुढील आठवड्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीने भारतासाठी याची किंमत 18,500 रुपये इतकी ठेवली आहे. भारतात 26 ऑक्टोबरपासून AirPods 3 चा सेल सुरू होणार आहे.
  Published by:Karishma
  First published: