iPhone घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इथे मिळतेय 32000 ची सूट; फक्त उद्याचा दिवस

iPhone घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इथे मिळतेय 32000 ची सूट; फक्त उद्याचा दिवस

या दिवाळी आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेकांचं आयफोनचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, एवढी भरभक्कम सवलत मिळत आहे. कशी, कुठे आणि किती दिवस मिळणार सवलत?

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : कितीही नवे, स्वस्त फोन बाजारात आले असले तरी iPhone ची क्रेझ कमी झालेली नाही. iPhone महाग आहे, तरी त्याची भुरळ अनेकांना आहे. पण या दिवाळी आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेकांचं  आयफोनचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, एवढी भरभक्कम सवलत मिळत आहे. Amazon वर परत एकदा Amazon Great Indian Festival सेल सुरू झाला आहे. हा सेल 17 ऑक्टोबरला संपत आहे. स्मार्टफोनवर मोठी सूट या फेस्टिवलमध्ये मिळत आहे.

या सेलमध्ये सॅमसंग, शाओमी,ओप्पो तसंच iPhone XR या फोन वर अधिक प्रमाणात सूट देण्यात येत आहे. या सेल मध्ये iPhone XR 64 GB स्टोरेज असलेला फोन 44,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

हेही वाचा -  Vodafone कडून 150 जीबी बोनस डेटा, 399 रुपयांच्या प्लॅनवर अशी आहे ऑफर

या फोन ची मूळ किंमत 49,900 एवढी आहे. आयफोनXR च्या 64 GB  फोनवर 11,900 रुपयांची सूट देण्यात येत आहे.

2118 रुपये देऊन मिळेल iPhone

आयफोनवर no cost EMI  चा पर्याय देखील देण्यात आला आहे. तुम्ही हा फोन महिन्याला 2118 रुपयांचा EMI  भरून खरेदी करू शकता.

128GB आणि 256GB स्टोरेज असलेले iPhone XR स्वस्त

iPhone XR 128 GB स्टोरेज असलेला फोन तुम्ही 49,999 रूपयामध्ये खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 54,900 रू ईतकी आहे. 256GB स्टोरेज असलेल्या फोनवर देखील 31,901 रुपयाची सूट देण्यात येत आहे. याची मूळ किंमत 91900 र आहे.हा फोन सेल मध्ये तुम्हाला 59,999 मिळू शकतो.

------------------------------------------

संबंधित बातम्या

सॅमसंग 48 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

फेस्टिव्हल ऑफर : 14,999 रुपयांच्या Xiaomi फोनवर 8,450 रुपयांची सूट!

श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्माचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

First published: October 16, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading