Home /News /technology /

20 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय iPhone; Flipkart वर धमाकेदार ऑफर

20 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय iPhone; Flipkart वर धमाकेदार ऑफर

iPhone SE तुम्हाला 20 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळू शकतो. सगळ्या ऑफर्सचा उपयोग करून iPhone SE जवळपास 17,549 पर्यंत घेता येऊ शकतो.

  मुंबई, 17 ऑक्टोबर : एप्रिल 2020 मध्ये लॉन्च झालेल्या iPhone SEची मार्केटमध्ये मोठी क्रेझ आहे. पण त्याची प्रसिद्धी अधिक वाढवण्यासाठी Flipkartने आपल्या बिग बिलियन सेलमध्ये या फोनच्या किंमतीवर तब्बल 12,000ची सूट जाहीर केली आहे. म्हणजेच iPhone SEच्या 64GB मॉडेलची किंमत या सेल मध्ये 39,999 ऐवजी केवळ 27,999 इतकी झाली आहे. इतकंच नाही तर SBIच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आणखी 10% सूट सुद्धा मिळू शकते. यावर एक्सचेंज ऑफरही असल्याने तुमचा आयफोन एसई तुम्हाला 20 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळू शकतो. या सगळ्या ऑफर्सचा उपयोग करून iPhone SE फोन जवळपास 17,549 पर्यंत घेता येऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये, एक्सचेंज होत असणारा फोन, सर्वात महत्त्वाचा आहे. या खरेदीवेळी iPhone 7 एक्सचेंजमध्ये देत असताना जवळपास 8700 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळते. ही किंमत प्रत्येक ब्रँड आणि मॉडेलनुसार बदलत जाते. एखाद्या Xiaomi ब्रँडच्या वर्किंग कंडिशन स्मार्टफोनसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 6300 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल. हे वाचा : ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक तसंच इतर ब्रँड्स Honor, Motorola, Oppo, Realme, Samsung आणि Vivo यांच्यासाठी ही एक्सचेंज व्हॅल्यू मॉडेलनुसार बदलत जाईल. या एक्सचेंज व्हॅल्यू सोबतच ग्राहकांना SBIच्या डेबिट कार्डवर 1250 रुपये आणि क्रेडिट कार्डवर 1750 रुपयांची सूट मिळेल. इतर ग्राहकांना Flipkart Axis Bank आणि Axis Bank Buzz या क्रेडिट कार्ड्सवर प्रत्येकी 5% सूट मिळेल. त्याशिवाय EMIवर खरेदी करणाऱ्यांसाठी सुद्धा अनेक ऑफर्स आहेत. ICICI Bank, Yes Bank, HSBC, HDFC Bank या बँकांच्या क्रेडिट कार्ड्सवर 9 महिन्यापर्यंत no-cost EMI ऑफर सुद्धा लागू होते. त्याच सोबत स्टँडर्ड EMI ऑप्शन्स आणि कॅश ऑन डिलिव्हरीची सोयही आहे.

  हे वाचा : iPhone 11 साठी बंपर ऑफर! असा मिळवा 16 हजारांहून अधिक डिस्काउंट

  iPhone SE फीचर्स - 4.7-inch Retina HD display सोबत 12 मेगापिक्सल कॅमेरा, A13 Bionic SoC चीप जी iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या मॉडेल्सलाही आहे. तसंच दमदार बॅटरी बॅकअप असलेला हा फोन या किंमतीत मिळणं iPhone प्रेमींसाठी पर्वणीच ठरत आहे. हे वाचा : आता चोरी होणार नाही तुमची कार; 'हे' हायटेक लॉक होणार गार्ड
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Iphone

  पुढील बातम्या