iPhone 11 मिळतोय फक्त 39 हजार 300 रुपयांत, तुम्हाला माहिती आहे का?

iPhone 11 मिळतोय फक्त 39 हजार 300 रुपयांत, तुम्हाला माहिती आहे का?

Apple कंपनीने नवी आयफोन 11 सिरीज लाँच केली आहे. यात iPhone 11 ची किंमत 64 हजार 900 रुपये इतकी आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : अॅपलने नवी आयफोन 11 सिरीज 10 सप्टेंबरला लाँच केली. यामध्ये iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लाँच करण्यात आले. या फोनची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली. त्याची किंमत आवाक्याबाहेर असल्यानं लोकांसमोर प्रश्न होता. पण आता आम्ही तुम्हाला हाच आयफोन 39 हजार 300 रुपयांत कसा खरेदी करायचा ते सांगणार आहे.

भारतात आयफोनच्या बेस मॉडेलची किंमत 64 हजार 900 रुपये आहे. मात्र हाच फोन फक्त 39 हजार 300 रुपयातं खरेदी करता येईल. यासाठी तुमच्याकडे HDFC Infinia Credit Card असायला हवं. यावरून तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू शकता.

एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार या कार्डवरून Apple iPhone 11 च्या खरेदीवर 6 हजार रुपयांची सूट मिळेल. तसेच याशिवाय कार्डवर रिवॉर्ड पॉइंट मिळतील. त्यांची किंमत 19 हजार 600 रुपये इतकी असेल. या कार्डवर 10X रिवॉर्ड पॉइंट मिळत आहेत. या ऑफरचा फायदा फक्त HDFC Infinia Credit Card वर मिळेल.

तुम्ही रिवॉर्ड पॉइंटमधून मिळालेले 19 हजार 600 रुपये आणि खरेदीतली 6 हजार रुपयांची सूट वजा केलीत तर iPhone 11 तुम्हाला 39 हजार 300 रुपयांत मिळेल.

आयफोन 11 चे प्री बुकिंग सुरू आहे. हा फोन 27 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. अॅपलची अधिकृत स्टोअर्सशिवाय अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएमवरून बुकिंग करता येतं.

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 24, 2019, 2:36 PM IST
Tags: iphone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading