मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple iPhone 14 सीरीज यादिवशी होणार लाँच, सर्वात हटके फोनची काय असेल किंमत

Apple iPhone 14 सीरीज यादिवशी होणार लाँच, सर्वात हटके फोनची काय असेल किंमत

सोशल मीडियावर अनेक टेक एक्सपर्ट्सकडून iPhone 14 बाबत सतत नवे खुलासे होत आहेत. लाँचिंगआधी या फोनबाबत अनेक चर्चा असून बाजारात याच्या धमाकेदार एन्ट्रीची अनेकांना उत्सुकता आहे.

सोशल मीडियावर अनेक टेक एक्सपर्ट्सकडून iPhone 14 बाबत सतत नवे खुलासे होत आहेत. लाँचिंगआधी या फोनबाबत अनेक चर्चा असून बाजारात याच्या धमाकेदार एन्ट्रीची अनेकांना उत्सुकता आहे.

सोशल मीडियावर अनेक टेक एक्सपर्ट्सकडून iPhone 14 बाबत सतत नवे खुलासे होत आहेत. लाँचिंगआधी या फोनबाबत अनेक चर्चा असून बाजारात याच्या धमाकेदार एन्ट्रीची अनेकांना उत्सुकता आहे.

नवी दिल्ली, 7 मे : Apple iPhone 14 च्या नव्या सीरीजची मोठी चर्चा आहे. लाँचिंगआधी या फोनबाबत अनेक चर्चा असून बाजारात याच्या धमाकेदार एन्ट्रीची अनेकांना उत्सुकता आहे. टेक एक्सपर्ट्सनुसार, iPhone 14 ची नवी सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते.

ही सीरीज सॅटेलाइट कम्युनिकेशन कनेक्टिव्हीटीसह असेल अशी माहिती आहे. iPhone 14 सीरीजचे सर्व फोन ऑटोफोकस फ्रंट फेसिंग कॅमेरासह f/1.9 अपर्चरसह येतील.

सर्वात मोठा फोन -

या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 चे चार नवे वेरिएंट लाँच केले जातील. यात iPhone 14, Phone 14 Pro, Phone 14 Max, Phone 14 Pro Max सामिल असतील. या सीरीजमध्ये iPhone 14 Mini लाँच केला जाणार नसल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर अनेक टेक एक्सपर्ट्सकडून iPhone 14 बाबत सतत नवे खुलासे होत आहेत. ही सीरीज मोठ्या डिस्प्लेसह लाँच होईल. पण यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max 6.7 इंची डिस्प्ले साइजसह लाँच केला जाईल. तसंच याच्या iPhone 14 आणि iPhone 14 Pro 6.1 डिस्प्लेसह लाँच केला जाईल.

सोशल मीडियावर याच्या किमतीबाबतही मोठी चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीरीजमधील बेसिक फोन iPhone 14 ची किंमत 60000 रुपयांजवळपास असेल. iPhone 14 Pro ची किंमत जवळपास 68000 रुपये असू शकते. iPhone 14 Pro Max ची किंमत 91000 रुपयांजवळपास असू शकते.

हे वाचा - मोबाइल फोनला सायबर अटॅकचा धोका, Fraud पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच

iPhone 14 सीरीज नव्या अपग्रेडसह येईल. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये फेस आयडी सेंसर आणि सेल्फी कॅमेरासाठी एक पिल शेप कटआउट आणि होल देण्यात आला आहे. iPhone 14 मध्ये वाइड अँगल कॅमेरासाठी नवा 48 मेगापिक्सल सेंसर असण्याची शक्यता आहे. iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. यात 48 मेगापिक्सल वाइड, 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो लेन्स असेल. Pro मॉडेल 8GB रॅमसह असू शकतो.

ही नवी सीरीज लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट कम्युनिकेशन मोडसह येईल. या फीचरवर Apple मागील अनेक काळापासून काम करत आहे. LEO च्या मदतीने विना सिग्नलही मेसेज पाठवता येऊ शकतो, तसंच कॉलही करता येऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Apple, Iphone, Tech news