मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple लव्हर्ससाठी बॅडन्यूज! पुढे ढकललं जाऊ शकतं iPhone 14 स्मार्टफोनचं लाँचिंग, धक्कादायक अहवाल आला समोर

Apple लव्हर्ससाठी बॅडन्यूज! पुढे ढकललं जाऊ शकतं iPhone 14 स्मार्टफोनचं लाँचिंग, धक्कादायक अहवाल आला समोर

Apple लव्हर्ससाठी बॅडन्यूज! पुढे ढकललं जाऊ शकतं iPhone 14 स्मार्टफोनचं लाँचिंग, धक्कादायक अहवाल आला समोर

Apple लव्हर्ससाठी बॅडन्यूज! पुढे ढकललं जाऊ शकतं iPhone 14 स्मार्टफोनचं लाँचिंग, धक्कादायक अहवाल आला समोर

Apple iPhone 14 ची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी मोठी बातमी आहे. iPhone चाहत्यांना नवीन आयफोनसाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 07 ऑगस्ट: iPhone 14 ची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी आहे. नवीन iPhone लाँच होण्यास उशीर होऊ शकतो. जग नवीन आयफोनची आतुरतेनं वाट पाहत असताना हा बातमी समोर आली आहे. मागील अहवाल आणि चर्चांमध्ये असं म्हटलं जात होतं की, पुढील आयफोन मालिका 13 सप्टेंबर रोजी लाँच होईल, परंतु ताज्या माहितीनुसार Apple चाहत्यांना नवीन आयफोनसाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागेल. चीन आणि तैवानमधील वाढता तणाव हे यामागचं कारण असू शकतं. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे ही समस्या उद्भवली, ज्यावर चीननं आक्षेप घेतला. परंतु याचा आगामी आयफोन 14 लाँचशी कसा काय संबंध आहे? चला पाहूया विस्तृतपणे... iPhone 14 चे उत्पादन कमी होऊ शकते- चिपमेकर TSMC Apple च्या iPhones च्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे आणि ही कंपनी चीनमध्ये चिप्स पुरवते, जिथे iPhones चा मोठा भाग असेंबल केला जातो. GSMArena च्या अहवालानुसार, चीन आणि तैवान यांच्यातील चालू तणावामुळे चीनी कम्युनिस्ट पक्षाला शिपिंग दस्तऐवजांमध्ये तैवान किंवा चीन प्रजासत्ताकच्या कोणत्याही उल्लेखावर बंदी घालण्यासाठी नवीन नियम लागू करण्यास भाग पाडलं आहे. याचा अर्थ असा आहे की, सर्वच नाही परंतु काही हार्डवेअर तैवानला परत पाठवले जाऊ शकतात आणि परिणामी आयफोन 14 चे उत्पादन कमी होऊ शकते, असं अहवालात म्हटलं आहे. हेही वाचा - Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी
 Apple ने ‘मेड इन तैवान’ किंवा ‘रिपब्लिक ऑफ चाइना’ लेबल काढण्याची केली विनंती -
पेलोसी पेगट्रॉनचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ TSMC अधिका-यांसोबत प्रवास करताना दिसल्या, त्यामुळं अ‍ॅपल आणि इतर यूएस-आधारित कंपन्यांमध्ये तणाव वाढला आहे, यामुळे चीन आणि तैवान यांच्यात भयंकर व्यापार युद्धाची सुरुवात झाली आहे. GSMArena च्या अहवालानुसार, Apple ने सर्व ‘मेड इन तैवान’ किंवा ‘रिपब्लिक ऑफ चाइना’ लेबले काढून टाकण्याची किंवा बदलण्याची विनंती केली आहे. Apple विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी दावा केला आहे की, कंपनी चीनशिवाय प्रथमच भारतातून iPhone 14 पाठवण्याची योजना आखत आहे. फॉक्सकॉनची भारतातील आयफोन उत्पादन साइट 2022 मध्ये पहिल्यांदाच चीनसोबत नवीन 6.1" iPhone 14 शिप करू शकते. हे खरे असल्यास, Apple iPhone ला प्रथमच "मेड इन इंडिया" टॅग केलं जाईल. याशिवाय iPhone 14 Pro Max च्या स्क्रीन आणि कॅमेरा लेन्समध्ये गुणवत्तेच्या समस्या असल्याच्याही अफवा आहेत. पण आयफोन 14 कधी लाँच होणार हे अजूनही अनिश्चित आहे.
First published:

Tags: Iphone, Smartphone

पुढील बातम्या