मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /iPhone 13 मध्ये मोठी त्रुटी? युजर्सचा सोशल मीडियावर संताप! काय आहे प्रकरण?

iPhone 13 मध्ये मोठी त्रुटी? युजर्सचा सोशल मीडियावर संताप! काय आहे प्रकरण?

आघाडीची स्मार्टफोन कंपनी Apple च्या अलीकडे आलेल्या iPhone 13 या मॉडेलने अनेक युजर्सना निराश केलं आहे. या फोनमध्ये नॉइज कॅन्सलेशन होत नसल्याने युजर्सना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत.

आघाडीची स्मार्टफोन कंपनी Apple च्या अलीकडे आलेल्या iPhone 13 या मॉडेलने अनेक युजर्सना निराश केलं आहे. या फोनमध्ये नॉइज कॅन्सलेशन होत नसल्याने युजर्सना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत.

आघाडीची स्मार्टफोन कंपनी Apple च्या अलीकडे आलेल्या iPhone 13 या मॉडेलने अनेक युजर्सना निराश केलं आहे. या फोनमध्ये नॉइज कॅन्सलेशन होत नसल्याने युजर्सना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत.

पुढे वाचा ...

  मुंबई, 28 डिसेंबर : सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. Apple या अमेरिकन टेक कंपनीच्या iPhone ची क्रेझ साऱ्या जगभर असते. iPhone इतर फोनच्या तुलनेत खूप महागही असतात. तरीही आयफोन खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. आयफोनच्या नव्या मॉडेल्सची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र, iPhone 13 या मॉडेलने अनेक युजर्सना निराश केलं आहे. या फोनमध्ये नॉइज कॅन्सलेशन होत नसल्याने युजर्सना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत.

  Apple कंपनीचे iPhone नॉइज कॅन्सलेशन फीचर्ससह येतात. फोन कॉल उचलल्यानंतर सभोवतालचा अन्य आवाज ऐकू येणं कमी होतं. यामुळे संवाद साधण्यात सहजता येते. iPhone 5 ते iPhone 12 पर्यंतच्या iPhone च्या सर्व मॉडेल्समध्ये हे फीचर देण्यात आलं आहे; पण आयफोन 13 मध्ये नॉइज कॅन्सलेशन फीचरमध्ये अडचण येत आहे. कंपनीकडे नॉइज कॅन्सलेशन फीचरची मागणी युझर्सकडून गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे. मोबाइलमध्ये नॉइज कॅन्सलेशन फीचर नसेल तर आजूबाजूचा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकायला येतो. हा त्रास iPhone 13 च्या युजर्सना सध्या अनुभवायला मिळतो आहे.

  फ्रंट माइक iPhone 13 मध्ये नसल्याची तक्रार hrowawayowl999 या Reddit युजरने 24 डिसेंबरला केली आहे. हे फीचर सेटिंग अॅक्सेसिबिलिटी ऑडिओ/व्हिज्युअलमध्ये आढळते. iPhone 13 मध्ये हे फीचर नसल्याबद्दल अन्य Redditors चं एकमत झालं आहे. वास्तविक, iPhone 13 मध्ये संबंधित माइक आहे; मात्र, नॉइज कॅन्सलेशन न होण्याची अडचण सॉफ्टवेअर त्रुटीमुळे निर्माण झाली आहे.

  तुमचा Smartphone होतोय Hang? हे सोपे उपाय ठरतील फायदेशीर

  Apple फोरममधील चर्चेत rpwils2 या युजरने लिहिलं आहे, की त्याला iPhone 13 Pro Max मध्ये आवाज बंद करण्याचं टॉगल दिसलं नाही. ते हटवण्यात आलंय का? असा सवाल त्याने विचारला. त्यावर एका Apple कम्युनिटी स्पेशालिस्टने उत्तरात म्हटलं आहे, की iPhone सेटिंगमध्ये नॉइज कॅन्सलेशन सुरू करण्याची आवश्यक्यता आहे आणि iPhone वर ऑडिओ सेटिंग्ज अॅडजस्ट करण्याच्या मदतीसाठी एक आर्टिकल लिंक करण्यात आलं आहे; पण iPhone 13 युजर्सना आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये ही सुविधाच दिसत नसल्याचं समोर आलं आहे.

  यावर dagocarlito या युजरने म्हटलं आहे, की iPhone 13 मध्ये iOS 15 वर सध्या हा पर्याय नाही. कारण यात त्रुटी आढळत आहेत. यासंदर्भात त्याने Apple सपोर्टशी संवाद साधला असून, यावर सध्या ते काम करत असल्याचं त्याला सांगण्यात आलं. IPhone 13 वर बोलताना CarPlay वर इकोसोबतही अडचण निर्माण होत असल्याचं सांगून, ती समस्या लवकरात लवकर दूर करण्याची गरज असल्याचं dagocarlito या युझरने म्हटलं आहे.

  Flipkart Year End Sale: लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतेय भरघोस सूट; लगेच करा ऑर्डर

  तब्बल दोन महिने होऊन आणि iOS 15.2 अपडेटनंतरही ही समस्या सुटलेली नाही. तसंच iOS 15.3 बीटासुद्धा ही समस्या सोडवण्यात असफल ठरलं आहे. Apple कंपनीचं तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे. नवनवीन अपडेट्ससह iPhone लाँच करून कंपनीने ग्राहक टिकवून ठेवले आहेत. गेल्या काही वर्षांत Apple ने मोठी मजल मारली आहे. आता ही समस्या सोडवण्यासाठी कंपनी किती वेळ घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  First published:

  Tags: Apple, Iphone, Smartphones