Home /News /technology /

Apple iPhone-12 सीरिज आज होणार लाँच, वाचा काय आहेत यातील कमाल फीचर्स

Apple iPhone-12 सीरिज आज होणार लाँच, वाचा काय आहेत यातील कमाल फीचर्स

ॲपल आयफोनची 12वी (Apple iPhone-12) सीरिज आज बाजारात येत आहे. कंपनीने दोन नवीन आयपॅड आणि ॲपल वॉच आणल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आयफोन 12 सीरिज बाजारात आणण्याचं ठरवलं आहे

    मुंबई, 13 ऑक्टोबर : ॲपल आयफोनची 12वी (Apple iPhone-12) सीरिज आज  बाजारात येत आहे. कंपनीने दोन नवीन आयपॅड आणि  ॲपल वॉच आणल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आयफोन 12 सीरिज बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. 13 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता लाँच सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणारा लाँच  या वर्षी कोविड-19 मुळे थोडा उशिराने होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच आयफोन 12 चं लॉचिंग थोडं उशिराने होईल असे कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. येणाऱ्या आयफोन 12 सीरिजमध्ये काय वैविध्य असणार त्यावर एक नजर टाकूया- ॲपल आयफोन दरवर्षी ग्राहकांचं इतकं लक्ष वेधून घेतो की आयफोन 12 बद्दल यंदा अफवासुद्धा तितक्याच ऐकायला मिळाल्या. या फोनची किंमत, डिझाईन, फिचर्स हे काही महिन्यांपूर्वीच लोकांना कळले आहेत. (हे वाचा-मोबाईल अ‍ॅप वापरण्यातही भारतीय आघाडीवर, Tiktok आणि Tinderला सर्वाधिक प्राधान्य) या वर्षी ॲपल आयफोन 12  चार वेगवेगळ्या रूपांत आणि आकारांत बाजारात येणार असल्याचं बोललं जात आहे. आयफोन 12 मिनी हा सगळ्यात लहान आहे. आयफोन 12 मिनी-5.4 इंच स्क्रीन  (iphone 12 mini), आयफोन 12-6.1 इंच स्क्रीन (iphone 12) , आयफोन 12 प्रो-6.1 इंच स्क्रीन (iphone 12 pro) , आयफोन 12 प्रो मॅक्स- 6.7 इंच स्क्रीन  ही अशी सीरिज (iphone 12 pro Max) आज लाँच होणार आहे. काय असणार किंमत? गेल्या वर्षीच्या आयफोन 11 सीरिजपेक्षा आयफोन 12 स्वस्त दरांत बाजारात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता आयफोन 12 मिनीच्या अहवालानुसार त्याची किंमत ही 699 डॉलर म्हणजेच 47,586 रूपये इतकी असू शकते.  आयफोन 12 ची किंमत 799 डॉलर म्हणजेच 50,400 रुपये, आयफोन 12 प्रो ची किंमत 999 डॉलर म्हणजेच 73,000 रुपये तसेच आयफोन 12 प्रो मॅक्स ची किंमत 1,099 डॉलर म्हणजेच 80,340 रुपये असू शकते. कसं असणार नवं डिझाइन? असे सांगितले जात आहे की आयफोन 12 ला एक वेगळं आणि विशिष्ट डिझाईन देण्यात आले आहे. आयफोन 6 सीरिज पासून कंपनी ही Curved डिझाइन्स जास्त बनवत नाही. म्हणूनच आयफोन 4 सारखं चपटं डिझाईन आयफोन 12 ला देण्यात आलं आहे. रंगामध्ये काय असणार वैशिष्ट्य? गेल्या महिन्याच्या शेवटी आयफोन 12 च्या रंगांबाबतीत खूप चर्चा झाली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार आयफोन 12 सीरिजमध्ये कदाचित नवीन नेव्ही ब्लू आणि लाल रंग येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या रंगांचे आयफोन काही नवीन नसले तरी आता आयफोन 12 मध्ये हे नवीन 2 रंग पाहायला मिळणार आहेत. आयफोन 12 चे स्मार्ट फीचर्स ॲपलचे ISO 14 सोबत A14 बायोनिक प्रोसेसर ही दोन नवीन वैशिष्ट्यं आहेत.  64 जीबी ते 512 जीबी या सर्व प्रकारांत आयफोन उपलब्ध होणार आहे. कॅमेराच्या बाबतीत काही गोष्टी या आयफोन 11 सारख्याच असणार आहेत. तसंच आयफोन 12 मध्ये ड्युअल कॅमेरा युनिट मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. तसंच आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स मध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट मिळण्याची शक्यता आहे. तसंच आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स यांना रिॲलिटी वैशिष्ट्ये जोडण्यासाठी डीप सेन्सिंग लीडर सेन्सर मिळणार आहे. गेल्या आठवड्यातील बातमीनुसार या वर्षी आयफोन 12 ची संपूर्ण सीरिज ॲपलच्या सुपर रेटिना XDR डिस्प्ले पॅनलसह (OLED Super Retina XDR) असणार आहे. (हे वाचा-WFH करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, Zoom अ‍ॅपचं शुल्क रुपयांमध्येही देता येणार) आयफोन 12 पॉवर ॲडाप्टरशिवाय येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये लाँच केलेल्या आयपॅड आणि ॲपल वॉचसोबत पॉवर ॲडाप्टर दिलेले नाहीत. 15 सप्टेंबरच्या कार्यक्रमात कंपनीनी असं सांगितलं की प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या तसंच पैशांच्या बचतीसाठी  ॲडाप्टर  दिला नव्हता. आयफोन 12 सोबतही ॲडाप्टर न मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Apple, Iphone

    पुढील बातम्या