iphone घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; iPhone 12 mini, iPhone 12 Pro Max वर घसघशीत सूट

iphone घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; iPhone 12 mini, iPhone 12 Pro Max वर घसघशीत सूट

Apple कंपनीच्या iPhone 12 mini, iPhone 12 Pro Max वर 6000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तुमचं iphone घेण्याचं स्वप्न या दिवाळीत पूर्ण करा.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर: आयफोन (iphone) वापरण्याची आवड आहे. बजेटच्या बाहेर आहे म्हणून आयफोन घेणं टाळात आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Appleने काही दिवसांपूर्वीच iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max असे 4 नवे फोन लाँच केले होते. त्यापैकी iPhone 12 आणि iPhone 12 Proच्या किंमतीमध्ये सूट दिली आहे. तसंच iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max हे दोन्ही फोन आता भारतामध्येही उपलब्ध झाले आहेत.

iPhone 12 Mini आणि 12 Pro Maxच्या किंमतीत सूट

  iPhone 12 Mini हा Appleच्या सीरिजमधला सर्वात लहान आणि स्वस्त फोन आहे. 64GB स्टोरेज मॉडलची किंमत 69,900 रुपये आहे. तर, 128GB आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडल्सची किंमत अनुक्रमे 74,900 रुपये आणि 84,900 रुपये आहे. iPhone 12 mini स्मार्टफोनला 5.4 इंची डिस्प्ले आणि ड्यूयल रियर कॅमेरा, वाईड आणि अल्ट्रा-वाईड अँगल लेंस असेल.

iPhone 12 Pro Max बद्ल बोलायचं झालं तर, फोन आयफोनच्या या सीरिजमधला सर्वात महागडा फोन आहे. 128GB व्हेरिअंटची किंमत 1,29,000 रुपये आहे. तर  256GB व्हेरिअंट 1,39,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 512GB व्हेरिअंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. iPhone 12 Pro Maxला 6.7 इंच डिस्प्लेसह, ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे.

आयफोनच्या या दोन्ही फोन्समध्ये ग्राहकांना मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. iPhone 12 Mini च्या खरेदीसाठी तुम्ही HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड वापरलंत तर 6,000 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर iPhone 12 Pro Max च्या खरेदीसाठी HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड वापरल्यास 5,000 रुपयांची सूट मिळेल. HDFC बँकेचं डेबिट कार्ड वापरल्यास या दोन्ही स्मार्ट फोनवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. Appleच्या स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही जुन्या आयफोनच्या बदल्यात नवीन आयफोनही घेऊ शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये iPhone 12 Mini वर 22,000 रुपये आणि iPhone 12 Pro Max वर 34,000 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मग या दिवाळीत आयफोन नक्की घरी घेऊन या !

Published by: Amruta Abhyankar
First published: November 15, 2020, 2:04 PM IST
Tags: iphone

ताज्या बातम्या