Apple iPhones वर जबरदस्त सूट; एक्सचेंज ऑफरमध्ये बंपर डिस्काउंट

Apple iPhones वर जबरदस्त सूट; एक्सचेंज ऑफरमध्ये बंपर डिस्काउंट

जर तुम्ही Apple चा एखादा जुना iphone वापरत असाल, तर Apple त्या फोनला एक्सचेंज करण्यावर चांगला डिस्काउंट ऑफर करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : अनेक स्मार्टफोन युजर्सना आपल्याकडे एक आयफोन असावा असं वाटतं. परंतु आयफोनच्या मोठ्या किंमतींमुळे तो सर्वांनाच घेता येणं शक्य होत नाही. पण एका ऑफर अंतर्गत Apple iphone खरेदी करण्याची संधी आहे. जुना फोन एक्सचेंज करून Apple iphone घेता येऊ शकतो.

iPhone 12 एक्सचेंज ऑफर -

भारतात iPhone 12 ची किंमत 79,990 रुपये आहे. तर iPhone 12 pro ची किंमत 1,19,000 रुपये आहे. जर तुम्ही Apple चा एखादा जुना iphone वापरत असाल, तर Apple त्या फोनला एक्सचेंज करण्यावर चांगला डिस्काउंट ऑफर करत आहे.

(वाचा - सावधान! UPI युजर्ससाठी NPCI कडून Alert जारी, या वेळेत पेमेंट करू नका अन्यथा...)

iPhone 6s Plus – 9,000 रुपये

iPhone 6s – 8,000 रुपये

iPhone 6 Plus –8,000 रुपये

iPhone 6 – 6,000 रुपये

iPhone XS Max – 35,000 रुपये

iPhone XS – 34,000 रुपये

iPhone XR – 24,000 रुपये

iPhone X – 28,000 रुपये

iPhone 8 Plus – 21,000 रुपये

iPhone 8 – 17,000 रुपये

(वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO)

HDFC कार्ड -

जर एचडीएफसी बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असल्यास, या डिल्सवर आणखी डिस्काउंट मिळू शकतो. Apple च्या Official website वर हे फोन खरेदी केल्यास, 20000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. तसंच iPhone XS 256GB वर 32,000 ची बंपर सूट आहे. iPhone 12 एक्सचेंज ऑफरमध्ये 47,900 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

जर तुमच्याकडे अँड्रॉईड स्मार्टफोन असेल आणि Apple iPhone 12 मध्ये अपडेट करायचं असल्यास, Samsung च्या गॅलेक्सी S10, गॅलेक्सी S10, गॅलेक्सी नोट 10 वर 23,020 रुपयांपासून 29,000 रुपयांपर्यंतची सूट मिळते आहे. तर OnePlus 7, Oneplus 7T वर 15,655 रुपयांपासून ते 19,170 पर्यंतची सूट मिळू शकते.

Published by: Karishma Bhurke
First published: January 23, 2021, 4:07 PM IST
Tags: iphone

ताज्या बातम्या