मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /गुडन्यूज! iPhone 12 खरेदी करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर

गुडन्यूज! iPhone 12 खरेदी करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर

गुडन्यूज! iPhone 12 खरेदी करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर

गुडन्यूज! iPhone 12 खरेदी करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर

Apple iPhone 12 Discount: जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही आकर्षक सवलतीत iPhone 12 खरेदी करू शकता. हा फोन Amazon आणि Flipkart वर सवलतीत उपलब्ध नसेल, पण तुम्ही तो Croma वरून स्वस्तात खरेदी करू शकता.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 ऑगस्ट: आयफोन खरेदी करावा, अशी अनेकांची इच्छा असते, परंतु आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना इतर स्मार्टफोनपेक्षा खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु आता एक ऑफर सुरू आहे, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही परवडणाऱ्या किमतीत आयफोन 12 (Discount offer on  iPhone 12) खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन तुम्ही क्रोमा स्टोअरमधून कमी किमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. iPhone 14 लवकरच लॉन्च होणार आहे आणि त्याआधी विक्रेत्यांना त्यांचा जुना स्टॉक संपवायचा आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात आयफोन मिळवू शकता.

iPhone 12 वर काय ऑफर आहे?

  • iPhone 12 चा बेस व्हेरिएंट म्हणजेच 64GB स्टोरेज व्हेरिएंट क्रोमा स्टोअरवर परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. हा फोन वेबसाइटवर 52,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.
  • यावर तुम्हाला HDFC बँकेच्या कार्ड ऑफर मिळू शकतात. कार्डवर तीन हजार रुपयांची सूट आहे. यानंतर iPhone 12 ची सुरुवातीची किंमत 49,900 रुपये आहे. ही ऑफर क्रोमा ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे.
  • तथापि, ही ऑफर तुम्हाला ऑफलाइन स्टोअरवर मिळेल की नाही हे सध्यातरी कोणतीही माहिती नाही. त्याचबरोबर हा फोन Amazon आणि Flipkart वर 58 हजार रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला फक्त क्रोमावर सर्वोत्तम डील मिळत आहे.

हेही वाचा:  Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम

स्मार्टफोनमधील स्पेसिफिकेशन-

A14 बायोनिक चिपसेट iPhone 12 मध्ये उपलब्ध आहे. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 12MP आहे. याशिवाय तुम्हाला 12MP ची दुय्यम लेन्स देखील देण्यात आली आहे. फोन सिरेमिक शील्ड संरक्षणासह येतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला नवीनतम iOS मिळते. iPhone 12 आणि iPhone 13 मध्ये फारसा फरक नाही. विशेषत: डिझाइनच्या बाबतीत, तुम्हाला कोणताही मोठा फरक दिसणार नाही. दोन्ही फोन जवळजवळ समान डिझाइन आणि कॅमेरासह येतात. परंतु तुम्हाला iPhone 13 मध्ये आणखी दमदार प्रोसेसर मिळेल.

First published:

Tags: Iphone, Smartphone