अॅपलचा नवा iPhone दहा दिवसांत लाँच होणार, इतकी असेल किंमत

अॅपलचा नवा iPhone दहा दिवसांत लाँच होणार, इतकी असेल किंमत

अॅपल iphone शिवाय इतरही काही उत्पादने लाँच करण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात नव्या उत्पादनांचे लाँचिंग होऊ शकते.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 30 ऑगस्ट : अॅपलचा नवा फोन 10 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली असून आयफोनच्या वार्षिक कार्यक्रमात फोन लॉन्च करण्यात येणार आहे. यासोबत iOS 13, iPadOS, watchOS आणि macOS सुद्धा लॉन्च केले जाईल असं म्हटलं जात आहे. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

अॅपल आयफोनमध्ये iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR हे फोन लॉन्च केले जातील. यासिवाय अॅपल पेन्सिलला सपोर्ट करणारे काही फोन लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. तसेच अॅपल टीव्ही आणि अॅपल वॉचचे लेटेस्ट व्हर्जनही लॉन्च केले जाईल.

वार्षिक कार्यक्रमात तीन फोन लॉन्च केले जातील. त्यामधील दोन फोनमध्ये रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. तसेच iPhone 11 या सिरीजमध्ये 6.1 इंचाचा मोठा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. iPhone XS मध्ये 5.8 इंच डिस्प्ले आहे.

अॅपल iPhone 11 च्या किंमतीबाबत अनेकांना उत्सुकता आहे. काही टेक वेबसाईटनी या फोनची किंमत 70 हजार रुपये इतकी असेल असा दावा केला आहे. तर काहींनी हा फोन 70 ते 90 हजार रुपयांपर्यंत मिळू शकेल असंही म्हटलं आहे.

अॅपल वॉचमध्ये टायटेनिअम आणि सिरॅमिक केसिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय नवा आयपॅडसुद्धा या कार्यक्रमात लाँच केला जाऊ शकतो. तसेच अॅपल यावेळी वेगवेगळ्या रंगात फोन लॉन्च करू शकते.

CamScanner मध्ये आला धोकादायक व्हायरस; तुमच्या मोबाईलवरून तातडीने करा Delete

दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या पूर्ण ऑफर!

SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: iphone
First Published: Aug 30, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या