मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता तुमचा iphone होणार अधिक सुरक्षित; कंपनीनं सुरक्षेसाठी आणलं हे फीचर; आता डाटाचोरीचा धोका टाळता येणार

आता तुमचा iphone होणार अधिक सुरक्षित; कंपनीनं सुरक्षेसाठी आणलं हे फीचर; आता डाटाचोरीचा धोका टाळता येणार

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलनं युजर्सच्या डाटा आणि प्रायव्हसीच्या सुरक्षेसाठी (apple security features) महत्त्वाचं फीचर आणलं आहे.

  • Published by:  Atik Shaikh
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपल सतत आपल्या युजर्ससाठी विविध फीचर्स आणि त्यातील अपडेट्स जारी करत असते. त्यातच आता कंपनीनं युजर्सच्या डाटा आणि प्रायव्हसीच्या सुरक्षेसाठी (apple security features) महत्त्वाचं फीचर आणलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅपलने यासंदर्भात एक पेटन्ट फाईल केलं आहे. ज्यात प्रायव्हसी फीचर्सबद्दल खुलासा करण्यात (apple security updates) आलेला आहे. त्यामुळं आता युजर्सशिवाय इतर कुणीही iPhone च्या स्क्रिनवरील कंटेंट पाहु शकणार नाही. काय आहे नवं पेटन्ट? Patently Apple नुसार या आठवड्यात अ‍ॅपलने US Patent and Trademark Office मध्ये नवा पेटन्ट फाईल केला आहे. Privacy Eyewear असं त्याचं नाव असणार आहे. स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी हे फीचर फार महत्त्वाचं (apple security threat) मानलं जात आहे. त्यामुळं आता युजर्सशिवाय दुसरा कोणताही व्यक्ती त्याच्या स्मार्टफोनची स्क्रिन आणि त्यातलं कंटेंट पाहु अथवा वाचू शकणार नाही.

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

कसं काम करेल हे फीचर? अ‍ॅपल कंपनीच्या युजर्ससाठी खास पद्धतीचे चश्मे तयार करण्यात येणार आहे. जो युजर्स या चश्म्यांना घालेल त्यांनाच iPhone च्या स्मार्टफोनची स्क्रिन दिसणार आहे. ज्यांच्याकडे हा चश्मा नसेल त्यांना स्क्रिन ही ब्लर दिसेल. त्याचबरोबर युजर्सची दाढी, हेयरस्टाईल आणि त्याने घातलेल्या चश्म्यांमुळंही त्याची ओळख करता यावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे.

लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स

समोर आलेल्या माहितीबाबत कंपनीनं अजूनही कुठलं स्पष्टीकरण दिलेलं  नाही. कारण अ‍ॅपलकडून सतत वेगवेगळे पेटंट फाईल करण्यात येतात. त्यातले मोजकेच फीचर्स प्रोडक्ट्समध्ये येत असतात. त्यामुळं आता या फीचर्समुळं युजर्सला किती सुरक्षा मिळणार हे ही बघणं फार महत्त्वाचं आहे.
First published:

Tags: Apple, Security, Smartphones

पुढील बातम्या