मुंबई, 20 ऑक्टोबर : अॅपल कंपनीचे स्मार्टफोन (Apple Smartphones), स्मार्टवॉच किंवा इतर गॅजेट्स आणि अॅक्सेसरीज या केवळ वस्तू नाही तर एकप्रकारे स्टेटस सिम्बॉल आहे. मात्र अॅपलचा चाहता वर्गही मोठा आहे. अॅपलच्या वस्तूच्या किंमतीपेक्षा त्याची सवय अनेकांना झाली आहे. अॅपलने अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी अनेक उत्पादने लाँच केली, ज्यात त्यांनी एक वस्तू लाँच केले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीने एक खास पॉलिशिंग कापड (Apple Polishing Cloth) लाँच केले आहे. ज्याचा वापर करुन यूजर्स डिव्हाइसचा डिस्प्ले सुरक्षितपणे आणि नीट स्वच्छ करू शकतात.
हा केवळ एक कापड असला तरी आता अॅपलचा आहे म्हणजे त्यांची किंमतही तशीच असणार. कंपनीने या मायक्रो फायबर कापडाची किंमत 19 डॉलर म्हणजे सुमारे 1,424 रुपये ठेवली आहे. यूजर्सना ते स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल. तर मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आपल्या प्रीमियम लॅपटॉपसह मोफत मायक्रोफायबर कापड पुरवते.
Apple introduces a $19 piece of fabric and calls it a “Polishing Cloth”. Remember when Steve Jobs would introduce new Apple products and say “One more thing…” and that one more thing was something awesome? Those days are long gone. Now we get a polishing cloth. pic.twitter.com/GyWctIq8QX
— Mike Sington (@MikeSington) October 19, 2021
अॅपलने आपल्या वेबसाइटवर या फॅब्रिकबद्दल सांगितले आहे की ते खूप मऊ आणि नॉन एब्रेसिव्ह आहे. नॅनो-टेक्सचर्ड ग्लास असलेल्या कोणत्याही Apple डिव्हाइस याद्वारे साफ केले जाऊ शकते. मात्र, कंपनीने या फॅब्रिकबाबत फारशी माहिती दिलेली नाही. यासह, अॅपलचे पॉलिशिंग कापड अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विकल्या जाणाऱ्या स्वस्त मायक्रोफायबर कापडापेक्षा वेगळे कसे आहे हे देखील सांगितले नाही.
पांढराच का असतो विमानाचा रंग? जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणं
अॅपलने आपल्या पॉलिशिंग कापडसाठी डिव्हाईसची यादीही शेअर केली आहे जे या कापडाने साफ करता येईल. या यादीमध्ये आयफोन SE सह आयफोन 6 ते आयफोन 13 प्रो मॅक्स सारख्या स्मार्टफोनची नावे आहेत. तसेच, अॅपलच्या मते, या कापडाचा वापर iPad आणि iMac ची स्क्रीन साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो.
पुढील 10 दिवसांत या Smartphone वर कायमसाठी बंद होणार WhatsApp, या युजर्ससाठी आता केवळ एकच पर्याय
ई-शॉपिंग वेबसाइटनुसार, या कापडाची विक्री पुढील 6 आठवड्यांपासून सुरू होईल. याचा अर्थ लोकांना 3 डिसेंबरनंतर अमेरिकेत Apple चे हे नवीन उत्पादन मिळेल. तूर्तास, Apple च्या चाहत्यांना यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Smartphone, Tech news