Home /News /technology /

Apple online store India : नव्या ॲपल स्टोअरमधून आयफोन घ्यावा की अमेझॉन, फ्लिपकार्टवरून?

Apple online store India : नव्या ॲपल स्टोअरमधून आयफोन घ्यावा की अमेझॉन, फ्लिपकार्टवरून?

Apple India Store मधून वस्तू घेणं स्वस्त पडेल की इतर ऑनलाईन मार्गाने? काय आहेत ॲपलच्या या नव्या व्हर्च्युअल दुकानाचे फायदे तोटे?

    मुंबई, 23 सप्टेंबर :  नवा iPhone किंवा ॲपलचं कुठलंही प्रॉडक्ट घ्यायचा विचार करत असाल तर आज लाँच झालेल्या Apple online store India बद्दल माहिती असेलच. पण या स्टोअरमधून केलेली खरेदी फायद्याची आहे का? की अमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओसारख्या इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच स्वस्त आहेत iPhone. मग ॲपलच्या या नव्या आभासी दुकानाचा काय आहे फायदा. जाणून घ्या Apple online store India बद्दल सर्व काही... ऑनलाईन खरेदीच्या विश्वात ॲपल कंपनीनं पाऊल ठेवलं असून, ॲपलच्या ऑनलाईन स्टोअरचा भारतात शुभारंभ‍ करण्यात आला आहे. या माध्‍यमातून खरेदीची विविध दालनं ग्राहकांसाठी खुली करण्‍यात आली आहेत. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या तुलनेत किमतीचा किती फरक हे पाहणं यात महत्त्वाचं ठरणार आहे. जगभरात ॲपलची ऑनलाईन स्टोअर्स असून, त्या ठिकाणच्या उत्पादनांचा अनुभव भारतातही देण्यास ही टीम सज्ज झाली आहे. विविध योजना घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहचणार आहेत. मात्र, ॲपलच्या स्टोअरमधून  थेट खरेदी करताना या बाबींचा विचार करावा लागणार आहे. किंमत किती? किमतीचा विचार केला तर आयफोन 11 च्या 64 जीबी मॉडेलची किंमत ॲपलच्या ऑनलाईन स्टोरअरवर 68 हजार 300 रुपये आहे तर याच मॉडेलची किंमत फ्लिपकार्ट या बेवसाइटवर अधिक स्वस्त आहे. Flipkart 66 हजार 900 रुपये आहे. iphone 11 Pro max मॉडेल हे ॲपलच्या ऑनलाईन स्टोअरवर 1 लाख 17 हजार 100 रुपयांत उपलब्ध आहे.  तर, याच मॉडेलची किंमत ॲमेझॉनवर 1 लाख 9 हजार 99 रुपये आहे.  अन्य थर्ड पार्टी सेलरचा विचार केला असता किमती कमी-जास्त होत राहतात. कुठे डिस्काउंट कुठे सेल यामध्ये याहूनही कमी किमतीत नवा आयफोन मिळू शकेल. यामुळे कायमच ॲपलच्या ऑनलाइन स्टोअरहून इतर वेबसाइटवर फोन किंवा इतर वस्तू स्वस्त मिळतील असं सांगता येणार नाही. काय आहेत फायदे? असं जरी असलं तरीही ॲपलच्या स्टोअरवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनेकप्रकारे फायदा होणार आहे. यात एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून 20 हजार 900 रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या तर त्यांना 6 टक्के म्हणजे दहा हजारांपर्यंतची  कॅशबॅक ऑफर या स्टोअरवर मिळणार आहे. ग्राहकांना वस्तू आणि त्यांच्या  खरेदी संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं विशेषतज्ज्ञांकडून स्टोअरच्या माध्यमातूनच मिळणार आहेत.  यासह ॲपल स्मार्टफोन बदलण्‍याची स्कीमही यात लक्षवेधी ठरते. ही योजना मार्यादित मॉडेलसाठीच आहे. हे आहे वैशिष्ट्य ॲपलच्या स्टोअरचं आणखी एक महत्त्वांच वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक त्याची गरज व आवडीनुसार  ॲपलचा कॉम्प्युटर मॅकचं कॉन्फिग्रेशन ठरवून ऑर्डर करू शकणार आहे. तसं केल्यानंतर त्याला कंपनीच्या अधिकृत पार्टचा वापर करून तयार केलेला कॉम्प्युटर मिळणार आहे. असं ग्राहकांना इतर कोणत्याही वेबासाइटवर सध्यातरी करता येत नाही. यासह कोणत्याही वस्तूवर दोन वर्षांची गॅरंटी, विमा, हमी स्टोअरकडून दिली जाईल. यासह ॲपलच्याच विशेष तज्ज्ञांकडून तुम्हाला तुमच्या उत्पादनाच्या दुरूस्तीची हमी मिळते तो एक विश्वास मिळतो. डिव्हाईस सेट करणे, त्यातील किरकोळ बदल, गरजेनुसार देखभाल ॲपलचे तज्ज्ञ करतील. खरेदीसाठी सर्व ऑनलाईन पेमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय सर्व वस्तुंची फ्री डिलिव्हरीही ग्राहकांना मिळेल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Apple

    पुढील बातम्या