मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता Apple Glass अ‍ॅडजेस्ट करणार तुमच्या घरातील दिव्यांचा प्रकाश, वाचा या भन्नाट टेक्नोलॉजीबद्दल

आता Apple Glass अ‍ॅडजेस्ट करणार तुमच्या घरातील दिव्यांचा प्रकाश, वाचा या भन्नाट टेक्नोलॉजीबद्दल

तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेअरेबल हेडसेटला सेन्सर (Sensor) बसवता येणार आहेत. या सेन्सरमुळे युजरला सभोवतालचा प्रकाश आपल्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करुन घेता येणं शक्य होईल.

तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेअरेबल हेडसेटला सेन्सर (Sensor) बसवता येणार आहेत. या सेन्सरमुळे युजरला सभोवतालचा प्रकाश आपल्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करुन घेता येणं शक्य होईल.

तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेअरेबल हेडसेटला सेन्सर (Sensor) बसवता येणार आहेत. या सेन्सरमुळे युजरला सभोवतालचा प्रकाश आपल्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करुन घेता येणं शक्य होईल.

नवी दिल्ली, 2 जून : नव्या अ‍ॅपल ग्लासमुळे (Apple Glass) तंत्रज्ञानानं (Technology) एक नवं शिखर गाठलं आहे. या तंत्रज्ञानामुळे अ‍ॅपल एआर हेडसेटला (Apple AR headset) साय-फाय (Sci-Fi) हे शीर्षक सिध्द करण्याची संधी मिळणार आहे. अ‍ॅपल इनसाईडरच्या अहवालानुसार, अ‍ॅपल ग्लास पेटंट (Patent) हे एक नवं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेअरेबल हेडसेटला सेन्सर (Sensor) बसवता येणार आहेत. या सेन्सरमुळे युजरला सभोवतालचा प्रकाश आपल्या गरजेनुसार अ‍ॅडजेस्ट करुन घेता येणं शक्य होईल, तसंच स्मार्ट होम लायटिंगच्या (Smart Home Lighting) आधारे घरातील दिव्यांचा प्रकाश देखील सेट करता येणार आहे. कोणत्याही हेडसेटच्या आधारे (ज्यास अ‍ॅपल तंत्रज्ञानाचा परवाना आहे) एखाद्या खोलीतील दिवे आपोआप मंद करता येणार आहेत. समजा एखाद्या AR headset परिधान केलेल्या युजरने लख्ख प्रकाशातून मंद प्रकाश असलेल्या खोलीत प्रवेश केल्यास त्याच्या हेडसेटमधील स्मार्ट होम लायटिंग सुरु होईल आणि या माध्यमातून खोलीतील दिव्यांचा प्रखरपणा गरजेनुसार सेट होईल. विशेष म्हणजे केवळ पेटंट हे अ‍ॅपल कंपनीचं असून कंपनी संपूर्ण एआर हेडसेटविषयी बोलताना दिसत आहे. त्यामुळेच गुगल (Google) किंवा अमेझॉन (Amazon) अ‍ॅपलचे एआर हेडसेट, होम किट, अ‍ॅपलचे स्मार्ट होम, किंवा सर्वात लोकप्रिय स्मार्ट होम इकोसिस्टीम याच्या उपलब्धतेविषयी विशेष भाष्य करत नसल्याचं दिसून आलं आहे.

(वाचा - या दिवशी लाँच होणार बहुचर्चित Poco M3 Pro 5G स्मार्टफोन, पाहा फीचर्स आणि किंमत)

पेटंटनुसार, एआर हेडसेटमध्ये (अ‍ॅपलचा किंवा परवानाधारक आहे असा) असा एक नियंत्रक आहे, की जो डेटा फिड करत ऑनबोर्ड सभोवतालचा प्रकाश सेन्सरच्या मदतीने नियंत्रित करु शकेल. या प्रकाश डेटाचा वापर करुन नियंत्रक ऑटोमॅटेकली युजरच्या खोलीतील प्रकाश कसा आहे हे तपासत त्याचं योग्य नियंत्रण करेल. होम वायफायशी जोडल्यानंतर कंट्रोलर होमकिटला ( किंवा गुगल, नेस्ट तसेच अमेझॉन अ‍ॅलेक्साला) हेडसेटमध्ये सेट केल्यानुसार स्मार्ट लाईटच्या मदतीने आसपासच्या उजेडाची किंवा दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता समायोजित करण्याची सूचना देईल. हे तंत्रज्ञान एकसारखं वाटत असले, तरी वेगळेपणाने अ‍ॅपलला इतरांपेक्षा अधिक अधोरेखित करते. ही बाब फारशी आश्चर्यकारक नसली, तरी येत्या काही वर्षांत जगाने अजूनही स्मार्ट होम उपकरणं विकसित करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(वाचा - Fake Alert! WhatsApp वर आलेल्या या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा...)

या स्थितीत अ‍ॅपलने फर्स्ट जनरेशनचा हेडसेड लाँच केला आहे, की नाही हे स्पष्ट होणं बाकी आहे. परंतु, अनुमानानुसार, अ‍ॅपल अधिक अद्ययावत अ‍ॅप्लिकेशन्स (Advance Applications), जेश्चर ट्रॅकर्स आणि ऑनबोर्ड कॅमेरा यांचा समावेश असलेले लाईटली बल्कर हेडसेट (Lightly Bulker Headset) लवकरच लाँच करेल. परंतु, हा हेडसेट लाँच करण्यापूर्वी त्यातील सर्व हार्डवेअर एका मानकाच्या चौकटीत बसवून सर्व गोष्टी अधिक चांगल्या आणि आकर्षक कशा करायच्या याबाबत नियोजन सुरु असल्याचं समजतं.
First published:

Tags: Apple, Tech news

पुढील बातम्या