• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Appleची भारतीय विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर; iPad, MacBook वर AirPods मिळणार मोफत

Appleची भारतीय विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर; iPad, MacBook वर AirPods मिळणार मोफत

या ऑफरद्वारे मिळणारं सर्वांत मोठं गिफ्ट म्हणजे AirPods हे आहे.

 • Share this:
  भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका महिन्यापूर्वी ॲपल कंपनीने (Apple) अमेरिकेत लाँच केलेला बॅक टू स्कूल डिस्काउंट प्रोग्रॅम (Back to School offer) आता भारतामध्येसुद्धा सादर करण्यात आला आहे. या ऑफरच्या माध्यमातून Apple च्या स्टोअरमधून कोणतंही प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर ग्राहकांना गिफ्ट मिळणार आहे. Appleच्या ऑनलाइन स्टोअरवरूनही (Online Store) या ऑफरचा लाभ घेता येईल. विद्यार्थी, पालक, नोंदणीकृत शाळांमधील शिक्षक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरद्वारे मिळणारं सर्वांत मोठं गिफ्ट म्हणजे AirPods हे आहे. 'बॅक टू स्कूल ऑफर' मर्यादित कालावधीसाठी आहे. त्यामुळे ऑफर समाप्त होण्यापूर्वी तिचा लाभ घेणं श्रेयस्कर आहे. इतर देशांतील विद्यार्थी आणि शिक्षक या ऑफरचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत असून, भारतातले विद्यार्थी व शिक्षकांनीही याचा लाभ घ्यावा, असं आवाहन Apple India कडून करण्यात आलं आहे. जे विद्यार्थी iPad Pro (कोणतंही मॉडेल), iPad Air (कोणतंही मॉडेल), Macbook (कोणतंही मॉडेल), Macbook Pro (कोणतंही मॉडेल), iMac (कोणतंही मॉडेल), Mac Pro आणि Mac Mini यांपैकी काहीही खरेदी करतील त्यांना AirPods विनामूल्य भेट देण्यात येणार आहेत. मोफत देण्यात येणारे AirPods हे वायर्ड चार्जिंग मॉडेल (Wired Charging Model) आहे. विद्यार्थी अतिरिक्त रक्कम देऊन यापेक्षा हायर व्हर्जनचे (Higher Version) एअर पॉड्स घेऊ शकतात. 4000 रुपये जास्त भरले तर वायरलेस चार्जिंगचे (Wireless Charging) AirPods मिळतील. तसंच 10,000 रुपये जास्त भरले, तर AirPods Pro हे अपग्रेडेड व्हर्जन मिळेल. AirPods, AirPods वायरलेस चार्जिंग आणि AirPods Pro ची मूळ किंमत अनुक्रमे 14,900 रुपये, 18,900 रुपये आणि 24,900 रुपये आहे. हे वाचा - Aadhar Card धारकांनी या चुका करणं टाळा! अन्यथा व्हॉल ऑनलाइन फ्रॉडचे शिकार विनामूल्य (Free) AirPods व्यतिरिक्त Apple कडून इतर उत्पादनांवरही सूट (Discount) देण्यात येत आहे. विद्यार्थी सवलतीमध्ये MacBook घेऊ शकतात. AppleCare वर 20 टक्के सवलत मिळवू शकतात. दरमहा 49 रुपये भरून Apple Music चं सबस्क्रिप्शन (Subscription) घेऊ शकतात. तसंच Apple TV+ सबस्क्रिप्शनसोबतच Apple आर्केड सबस्क्रिप्शन 3 महिने विनामूल्य मिळवू शकतात. Apple पेन्सिल आणि कीबोर्डवरही (Keyboard) सुद्धा विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येत आहे. Apple's Back to School ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतातली नोंदणीकृत शाळा किंवा संस्थेचे विद्यार्थी आहात हे सिद्ध करायला लागतं. UNiDAYS द्वारे तुम्ही जेव्हा ऑफरसाठी नोंदणी कराल, तेव्हा Apple तुमचे सर्व तपशील मागवेल व त्या माहितीची पडताळणी करील. तुम्हाला पडताळणीच्या (Verification) पोर्टलवर विद्यार्थी आयडी क्रमांक (Student ID Number) आणि शाळेचा पत्ता यांसारखे सर्व तपशील सादर करणं आवश्यक आहे. UNiDAYS मधल्या सर्व तपाशीलांची पडताळणी केली जाईल. त्यामध्ये पात्र झालात तरच या ऑफरचा तुम्हालाला लाभ घेता येऊ शकेल. या खास ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा आवडता iPad किंवा Mac खरेदी करून त्यावर AirPods मोफत मिळवू शकता
  First published: