सॅन फ्रान्सिस्को, 21 फेब्रुवारी : जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अॅपलने एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. अॅपलने एका भारतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या राकेश रॉकी शर्मा याच्याविरोधात तक्रार धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. कंपनीमध्ये कॉल करून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तर राकेशनेसुद्धा कंपनीने आपली खिल्ली उडवल्याचं म्हटलं. तसंच ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्याने केला.
राकेशने दोनवेळा अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. अॅपलने आरोप केला की, राकेश शर्माने 25 सप्टेंबर 2019 नंतर अनेकदा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास दिला आहे.
व्हॉइसमेलच्या माध्यमातून अॅपलच्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी राकेशने दिली असा आरोप कंपनीने केला आहे. तसेच अॅपल केअरला कॉल करूनही अशीच धमकी दिली. यानंतर त्याने थेट सीईओ टिम कूक यांच्या घरापर्यंत पोहोचला. त्यांच्याकडे जाताना फुलांचा गुच्छ आणि शॅम्पेनची बाटली घेऊन गेला होता. जानेवारी महिन्यात विनापरवानगी कुक यांच्या घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्रास दिल्यानंतर शर्माने सेटलमेंटची मागणी केली. त्यात दावा करताना म्हटलं की, तो हॉस्पिटलमध्ये असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आणि फोन कट केला. तसेच आपला कोणताही वकील नसून नेन्सी पेलोसी आहे. नेन्सी पेलोसी अमेरिकन खासदार आहे.
वाचा : कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टारांनाच कोरोना; आणखी एका डॉक्टरचा मृत्यू
अॅपलच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देण्याची ही पहिलीच घटना नाही. मात्र राकेशने केलेला प्रकार थोडा जास्तच होता. त्याने कुक यांच्या सुरक्षाव्यवस्थेला चकवलं. त्यानंतर बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिली. राकेशने टिम कुक यांच्यावर टीका करताना एक व्हिडिओसुद्धा ट्विटरवर पोस्ट केला आहे.
वाचा : झुकेरबर्गने घाम पुसण्यासाठी नेमली होती टीम, फेसबुक-द इनसाइड स्टोरी पुस्तकात दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple