मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; चिनी अ‍ॅप स्टोरवरून डिलीट केले 39,000 गेम अ‍ॅप्स

Apple ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; चिनी अ‍ॅप स्टोरवरून डिलीट केले 39,000 गेम अ‍ॅप्स

आधीही जूनमध्ये Apple ने चीनच्या हजारो अ‍ॅपचं अपडेट सस्पेंड केलं होते. Apple ने हा निर्णय सरकारी लायसन्सच्या कमीमुळे घेतला होता.

आधीही जूनमध्ये Apple ने चीनच्या हजारो अ‍ॅपचं अपडेट सस्पेंड केलं होते. Apple ने हा निर्णय सरकारी लायसन्सच्या कमीमुळे घेतला होता.

आधीही जूनमध्ये Apple ने चीनच्या हजारो अ‍ॅपचं अपडेट सस्पेंड केलं होते. Apple ने हा निर्णय सरकारी लायसन्सच्या कमीमुळे घेतला होता.

नवी दिल्ली, 1 जानेवारी : Apple ने चीनवर मोठी कारवाई केली आहे. अ‍ॅपलने चिनी अ‍ॅप स्टोअरवरून 39000 गेमिंग अ‍ॅप्स हटवले आहेत. चायनिज अ‍ॅप्सवर Apple कडून ही एका दिवसात होणारी सर्वात मोठी कारवाई आहे. Apple ने गेमिंग अ‍ॅप्स, अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय लायसन्स जमा न केल्यामुळे घेतला आहे. आतापर्यंत लायसन्समुळे अ‍ॅपलने एकूण 46,000 अ‍ॅप्स, अ‍ॅप स्टोअरवरून हटवले आहेत.

Apple ने सर्व गेम डेव्हलपर्सला लायसन्स दाखवण्यासाठी 31 डिसेंबर शेवटची तारीख दिली होती. परंतु डेव्हलपर्सने कोणतंही लायसन्स दिलं नाही. त्यानंतर Apple ने हा निर्णय घेतला आहे. रिसर्च फर्म Qimai नुसार, 1500 अ‍ॅप्सपैकी केवळ 74 अ‍ॅप्सने वेळेत लायसन्स दिले आहेत. Apple ने अद्याप या कारवाईबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

(वाचा - स्क्रीनमध्येच लपलेला असेल कॅमेरा; येतोय जगातला पहिला 4G ऑन-स्क्रीन कॅमेरा फोन)

Apple ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्व गेम डेव्हलपर्सला लायसन्स दाखवण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ दिला होता. कंपनीने त्यानंतर हा कालावधी वाढवून 31 डिसेंबर केला होता. परंतु कालावधी वाढवल्यानंतरही डेव्हलपर्सने लायसन्स न दिल्याने Apple ने हा निर्णय घेतला. चीनच्या अँड्रॉईड अ‍ॅप स्टोअरने लायसन्सच्या नियमांचं पालन केलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा - 2021 मध्ये या कार खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या काय आहे कारण)

या आधीही जूनमध्ये Apple ने चीनच्या हजारो अ‍ॅपचं अपडेट सस्पेंड केलं होते. Apple ने हा निर्णय सरकारी लायसन्सच्या कमीमुळे घेतला होता. अ‍ॅपलच्या या निर्णयामुळे 60000 हून अधिक गेमिंग अ‍ॅप्सचं अपडेट सस्पेंड झालं होतं.

First published:
top videos

    Tags: Apple