मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवीन फोनचा विचार करत असाल तर 13 ऑक्टोबरपर्यंत थांबा! iPhone 12 विषयी आली मोठी खबर

नवीन फोनचा विचार करत असाल तर 13 ऑक्टोबरपर्यंत थांबा! iPhone 12 विषयी आली मोठी खबर

Apple ने 13 तारखेच्या इव्हेंटची घोषणा केली आहे. iPhone 12 झोकात सादर होणार असल्याचं वृत्त आहे. त्याची फीचर्स (iPhone 12 features) वाचाच, पण हा नवा अॅपलचा फोन iPhone 11 पेक्षा स्वस्त असू शकतो, अशी माहिती आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

कॅलिफॉर्निया, 7 ऑक्टोबर : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला  iPhone 12  लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. Apple ने एका विशेष ऑनलाइन इव्हेंटची घोषणा केली असून, 13 ऑक्टोबरला या विशेष इव्हेंटमध्ये नव्या iphone ची याची घोषणा होऊ शकते. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी या इव्हेंटला (Apple event time) सुरुवात होणार आहे. या इव्हेंटमध्ये कोणत्या प्रॉडक्ट्ची घोषणा करण्यात येणार आहे, याची मात्र अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. पण  iPhone 12 ची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढंच नाही तर iphone 12 ची फीचर्स, रंग, रूप आणि किंमत याबाबतची माहितीसुद्धा लीक झाली आहे. खूशखबर म्हणजे iphone 11 पेक्षा iphone12 स्वस्त असू शकतो आणि खास लोकाग्रहास्तव मिनी आयफोनसुद्धा लाँच करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या काही टेक पोर्टल्सनी दिल्या आहेत. त्यामुळे या फेस्टिव्ह सीझनमध्ये नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर 13 तारखेपर्यंत थांबा.

नवा iPhone असेल स्वस्त?

13 ऑक्टोबरच्या इव्हेंटची घोषणा करताना अॅपलने Hi Speed असं लिहिलं असून विविध प्रकारच्या शेड्समध्ये Apple logo दिला आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारंगी रंग हायलाईट केला आहे. त्यामुळे  iPhone 12 ची घोषणा होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर आयफोनची विविध नवीन डिव्हाइसदेखील लाँच करण्यात येणार आहेत.  iPhone 12  श्रेणी लाँच होणार आहे की नाही हे अद्याप नक्की नाही. मात्र याचे चार नवीन व्हेरिएन्ट सादर होणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत.

यामध्ये  5.4 इंच डिस्प्ले असणारा मिनी आयफोन देखील लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. या फोनला iPhone 12 mini नाव देण्यात आलं असल्याचं समजतं. याची किंमत थोडी कमी असू शकते. या चार व्हेरिएन्टमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो  6.1 इंच डिस्प्लेमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर आयफोन 12 प्रो मॅक्स मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आयफोन 5G असणार आहेत. त्याचबरोबर दोन सेल्फी कॅमेरेदेखील यामध्ये मिळणार आहेत.

हे आहे कॅमेऱ्यांचं वैशिष्ट्य?

iPhone 12 आणि  iPhone 12 Max मध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी देखील 12 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर iPhone 12 प्रो आणि iPhone 12 प्रो मॅक्समध्ये देखील 12 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे. त्यामुळे आयफोन 12 च्या सीरीजमध्ये सर्व फोनला 12 मेगापिक्सल कॅमेराच मिळणार आहे.

First published:

Tags: Apple, Smart phone