मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Appleच्या पहिल्या हेडफोनची दमदार एन्ट्री; एका किल्कवर वाचा किंमत आणि फिचर्स

Appleच्या पहिल्या हेडफोनची दमदार एन्ट्री; एका किल्कवर वाचा किंमत आणि फिचर्स

अ‍ॅपलने (Apple) आपला पहिला ‘ओव्हर इयर हेडफोन’ (Over Ear Headphone) सादर केला आहे. अवघ्या 5 मिनिटांत चार्ज केल्यावर हे हेडफोन्स तब्बल दीड तास वापरता येतात.

अ‍ॅपलने (Apple) आपला पहिला ‘ओव्हर इयर हेडफोन’ (Over Ear Headphone) सादर केला आहे. अवघ्या 5 मिनिटांत चार्ज केल्यावर हे हेडफोन्स तब्बल दीड तास वापरता येतात.

अ‍ॅपलने (Apple) आपला पहिला ‘ओव्हर इयर हेडफोन’ (Over Ear Headphone) सादर केला आहे. अवघ्या 5 मिनिटांत चार्ज केल्यावर हे हेडफोन्स तब्बल दीड तास वापरता येतात.

मुंबई, 10 डिसेंबर: अ‍ॅपलने (Apple) आपला पहिला ‘ओव्हर इयर हेडफोन’ (Over Ear Headphone) सादर केला असून, एअरपॉड्स मॅक्स (Apple Airpods Max) असं त्याचं नाव आहे. या प्रीमियम हेडफोनची किंमत 59 हजार 900 रुपये ठरवण्यात आली असून, या हेडफोन्सची पूर्वनोंदणी सुरू करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून ‘एअरपॉड्स मॅक्स’ची विक्री सुरू होणार आहे. स्पेस ग्रे, स्काय ब्लू, सिल्व्हर, पिंक आणि ग्रीन अशा रंगांमध्ये हे हेडफोन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. अ‍ॅडाप्टिव्ह ईक्यू (Adaptive EQ) आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) ही या हेडफोन्सची विशेष फीचर्स आहेत.

या हेडफोन्समध्ये एच-वन चिपसेट असून, अ‍ॅक्सलरोमीटर आणि गायरोस्कोपही आहे. त्यामुळे ‘रिअल टाइम हेड मूव्हमेंट’चा माग (Real Time Head Movement) घेणे शक्य होणार आहे. ऑप्टिकल आणि पोझिशन सेन्सर्सही (Optical & Position Sensors) या हेडफोन्समध्ये आहेत. त्यामुळे हे हेडफोन्स कानावरून काढले की आवाज आपोआप बंद होतो.

स्पॅटियल ऑडिओ, ट्रान्स्परन्सी मोड यांसारखी अत्याधुनिक फीचर्सही ‘एअरपॉड्स मॅक्स’मध्ये देण्यात आली आहेत. त्याशिवाय स्टेनलेस स्टीलचा हेडबँडही (Stainless Steel Headband) त्याला आहे. त्यामुळे डोक्याच्या आकारानुसार त्याची अ‍ॅडजस्टमेंट करता येते.

अ‍ॅपलच्या या हेडफोन्सना डिजिटल क्राउनही (Digital Crown) देण्यात आला आहे, ज्याच्या साह्याने आवाज कमी-जास्त करता येऊ शकतो. त्याच्या साह्याने गाणं सुरू करता येईल, थांबवता येईलच, शिवाय कॉल नियंत्रणही त्याद्वारे शक्य आहे.

‘एअरपॉड्स मॅक्स’मध्ये 40 मिलिमीटरची डायनॅमिक ड्रायव्हर आणि ड्युएल नियोडॉयमियम रिंग मॅग्नेट मोटर आहे. त्यामुळे याच्या आवाजाचा दर्जा उच्च आहे.

बॅटरी दमदार

हा प्रीमियम वायरलेस हेडफोन (Premium Wireless Headphone) एका वेळी चार्ज केल्यानंतर बॅटरी (Battery Life) 20 तास टिकेल. अ‍ॅपलच्या लायटिंग कनेक्टरच्या साह्याने हे हेडफोन्स चार्ज करता येऊ शकतात. अ‍ॅपल एअरपॉड्स मॅक्स या हेडफोन्ससोबत एक मऊशार आणि बारीक ‘स्मार्ट केस’ही (Soft & Slim Smart Case) दिली जाणार आहे. त्यामुळे हेडफोन्सचे संरक्षण तर होईलच, पण त्या केसमध्ये हेडफोन्स ‘अल्ट्रा-लो-पॉवर स्टेट’मध्ये (Ultra Low Power State) राहतील. फक्त पाच मिनिटं चार्ज केल्यानंतर या हेडफोन्सवर दीड तास श्रवणानंद लुटता येईल.

First published:

Tags: Apple, Techonology