Apple Smart Watch, बॉडी टेम्परेचर आणि बरंच काही, फक्त एका क्लिकवर

Apple Smart Watch, बॉडी टेम्परेचर आणि बरंच काही, फक्त एका क्लिकवर

अॅपलचं कोणतंही नवीन प्रॉडक्ट येणार म्हटलं, की जगभरातील टेक-सॅव्ही लोक त्याकडे लक्ष ठेऊन असतात. अॅपल (Apple) आपल्या उत्पादनांमध्ये ठराविक काळानंतर नवनवीन फीचर्स समाविष्ट करत राहतं. सध्या स्मार्ट-वॉच (Smart Watch) हे अगदीच नेहमीचं झालं असलं, तरी 'अॅपल'चं स्मार्टवॉच अजूनही लोकांना आकर्षित करतं.

  • Share this:

मुंबई, 17 जून : अॅपलचं कोणतंही नवीन प्रॉडक्ट येणार म्हटलं, की जगभरातील टेक-सॅव्ही लोक त्याकडे लक्ष ठेऊन असतात. अॅपल (Apple) आपल्या उत्पादनांमध्ये ठराविक काळानंतर नवनवीन फीचर्स समाविष्ट करत राहतं. सध्या स्मार्ट-वॉच (Smart Watch) हे अगदीच नेहमीचं झालं असलं, तरी 'अॅपल'चं स्मार्टवॉच अजूनही लोकांना आकर्षित करतं. अॅपलची आता लाँच होणारी अॅपल वॉच -7 मध्येही काही नवीन फीचर्स असणार आहेत. माध्यमांमधील अहवाल पाहिले, तर हे वॉच अधिक 'हेल्थ सेंट्रिक' असणार आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये अॅपलच्या नव्या स्मार्ट वॉचबद्दल माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, Apple Watch 7 मध्ये बॉडी टेम्प्रेचर सेन्सर (Body Temperature Sensor) दिलं जाणार आहे. तसेच वॉचच्या याच व्हर्जनमध्ये कंपनी ब्लड शुगर सेन्सर देण्याचाही विचार करत आहे. कंपनीने खरच हे दोन सेन्सर दिल्यास ग्लूकोज लेव्हल आणि टेम्प्रेचर या वॉचच्या माध्यमातून कळू शकतील.

दरम्यान, ब्लड शुगर सेन्सर कंपनी एवढ्या लवकर देणार नसल्याचं कळतंय. कारण हे सेन्सर तयार करण्यासाठी अजून काही वर्ष लागतील. मात्र, 2022 मध्ये अॅपल वॉचमध्ये टेम्प्रेचर सेन्सर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपलच्या या नव्या वॉचमध्ये हेल्थ फिचरवर खास लक्ष केंद्रित करण्यात आलंय. शिवाय डिझाईनमध्येही थोडे बदल करण्यात येणार आहेत. या वॉचच्या डिस्पेवरील बॉर्डर कमी करण्यात येणार असून अल्ट्रा वाइडबँड फंक्शन दिलं जातंय. ते अॅपल एअर टॅग्सप्रमाणेच काम करतील.

महत्वाचं म्हणजे अॅपल वॉचच्या सध्याच्या व्हर्जनमध्ये ऑक्सिजन मॉनिटर (oxygen monitor) आहे. याशिवाय हार्ट रेट सेन्सर (heart rate sensor), ईसीजी (ECG support) सपोर्टदेखील देण्यात आला आहे. कोरोना काळात लोक आरोग्याबाबत जागरुक झाल्याने कंपन्यादेखील हेल्थ सेंट्रिक फिचर्स आणण्यावर भर देत आहेत. कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक ताप असल्याने बॉडी टेम्प्रेचर मोजणारं डिव्हाइस जवळ असणं ही गरज झाली आहे, त्यामुळे टेम्प्रेचर चेक करण्यासाठी या वॉचमध्ये कोणतं ऑप्शन दिलं जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्लड शुगर मॉनिटर करणं हे थोडं कठीण काम आहे. त्यामुळे हे फिचर वॉचमध्ये अॅड करण्यासाठी कंपनीला काम करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी ब्लड शुगर मॉनिटर करणारं फिचर आपल्याला दिसणार नाही. ते फिचर कसं असेल किंवा कसं काम करेल याबाबत कंपनीकडून अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

First published: June 18, 2021, 9:55 AM IST

ताज्या बातम्या