मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple लवकरच लॉन्च करणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Iphone, असे असतील Features

Apple लवकरच लॉन्च करणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Iphone, असे असतील Features

इतर नामांकित ब्रँडच्या तुलनेत आयफोन महाग असूनही नागरिक रांगा लावून त्याची खरेदी करतात. आपल्या देशातही आयफोनचे कोट्यवधी चाहते असून, आयफोन असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं.

इतर नामांकित ब्रँडच्या तुलनेत आयफोन महाग असूनही नागरिक रांगा लावून त्याची खरेदी करतात. आपल्या देशातही आयफोनचे कोट्यवधी चाहते असून, आयफोन असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं.

इतर नामांकित ब्रँडच्या तुलनेत आयफोन महाग असूनही नागरिक रांगा लावून त्याची खरेदी करतात. आपल्या देशातही आयफोनचे कोट्यवधी चाहते असून, आयफोन असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं.

न्यूयॉर्क, 18 नोव्हेंबर: अमेरिकेतल्या अ‍ॅपल (Apple) कंपनीच्या अत्याधुनिक आणि आगळ्यावेगळ्या फीचर्सनी सुसज्ज अशा आयफोन्सची (iPhone) जगभरात सर्वत्र एक वेगळीच क्रेझ आहे. आयफोन्सचा उच्चतम दर्जा, नावीन्यपूर्ण फीचर्स यांमुळे कोट्यवधी नागरिक याचे चाहते आहेत. अ‍ॅपल कंपनीही प्रत्येक नवा स्मार्टफोन दाखल करताना तो आधीच्या फोनपेक्षा एक पाऊल पुढे असेल, नवीन फीचर्सनी सुसज्ज असेल याची काळजी घेते. त्यामुळे इतर नामांकित ब्रँडच्या तुलनेत आयफोन महाग असूनही नागरिक रांगा लावून त्याची खरेदी करतात. आपल्या देशातही आयफोनचे कोट्यवधी चाहते असून, आयफोन असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानलं जातं.

सर्वसामान्य वर्गापेक्षा उच्चभ्रू, तसंच तरुण वर्ग याचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे भारतही (India) आयफोनसाठी मोठी बाजारपेठ (Market) आहे; मात्र अफाट किमतीमुळे बराच मोठा ग्राहक वर्ग आयफोनपासून दूर राहत असल्यानं अ‍ॅपल कंपनीने आपल्या मुख्य फोनपेक्षा कमी किंमतीतल्या दुसऱ्या मोबाइल फोनची मॉडेल्स दाखल करण्याचं धोरण अवलंबलं आहे. आयफोन स्वस्त किमतीत दाखल करता यावा यासाठी कंपनी प्रयत्न करत असते, जेणेकरून मोठा ग्राहक वर्ग आयफोनकडे वळवता येईल आणि या बाजारपेठेतला हिस्सा अधिक मजबूत करता येईल. कोरोना साथीच्या संकटातून जग आता सावरत असल्यानं मोबाइल फोनची बाजारपेठही (Mobile Phone Market) गजबजत आहे. मोबाइल उत्पादक कंपन्या नवनवीन उत्पादनं दाखल करत आहेत. या बाजारपेठेत अ‍ॅपल कंपनीही लवकरच आपली नवीन उत्पादनं दाखल करणार असल्याची चर्चा आहे. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा-  Laptop चा स्पीड Slow झालाय?, या पाच Tips चा करा वापर, होईल पहिल्यासारखा Speed

 ट्रेंड फोर्स या (TrendForce) प्रसिद्ध विश्लेषण संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, पुढील वर्षी जागतिक फोन बाजारात स्मार्टफोन उत्पादन सुमारे 1.39 अब्ज युनिट्सपर्यंत पोहोचू शकेल. अ‍ॅपल ब्रँडच्या धोरणात्मक योजनेबाबतही या अहवालात माहिती देण्यात आली असून, आगामी नवीन आयफोन उत्पादनं सर्वांचं लक्ष वेधून घेतील असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस चार फ्लॅगशिप फोनव्यतिरिक्त, अ‍ॅपल पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस मार्चच्या आसपास स्वस्त मॉडेल्सची नवीन आवृत्ती आयफोन एसई 3 च्या रूपाने (iPhone SE-3) दाखल करेल. आय फोन 13 (iPhone 13) मालिकेतल्या ए -15 (A15) फ्लॅगशिप प्रोसेसरने सुसज्ज आणि 5G नेटवर्कला सपोर्ट करणारा हा फोन अ‍ॅपलचा सर्वांत स्वस्त 5G मोबाइल फोनदेखील ठरेल आणि अनेक बाजारपेठांमध्ये त्याची मागणी वाढेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

आयफोन एसई 3चं (iPhone SE 3) डिझाइन आधीच्या आवृत्तीसारखंच असेल. सिंगल रिअर कॅमेरासह सुसज्ज अशा या फोनमध्ये 4.7-इंच नॉन-फुल स्क्रीन असेल. आयफोन एसई 3 साठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे समान iPhone XR आणि iPhone 11 आहेत, यात 6.1-इंच रिझोल्यूशन आहे. अलीकडच्या काही वर्षांत अ‍ॅपलच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या आयफोनपैकी हा एक आहे. यात 4.7 इंचांच्या तुलनेत पूर्ण-स्क्रीन डिझाइनदेखील आहे.

हेही वाचा-  सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम त्वरित पूर्ण करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

 आयफोन 14 चं डिझाइन आणि इतर गोपनीय गोष्टी अलीकडेच उघड झाल्या. त्यामुळे 2022 साठी आयफोन श्रेणीतल्या मोबाइल्सचं डिझाइन पूर्णपणे बदलण्यावर कंपनीने भर दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा स्प्रिंगबोर्ड असू शकतो, ज्यामुळे आयफोन एसईचं (iPhone SE) डिझाइनदेखील सुधारण्यास मदत होईल.

First published:

Tags: Apple, Iphone