मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ALERT: स्मार्टफोन वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात, हे App करतायत मोबाइलमध्ये घुसखोरी

ALERT: स्मार्टफोन वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात, हे App करतायत मोबाइलमध्ये घुसखोरी

काही स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या परवानगी विना काही मोबाइल अ‍ॅप त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

काही स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या परवानगी विना काही मोबाइल अ‍ॅप त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

काही स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या परवानगी विना काही मोबाइल अ‍ॅप त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: काही स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या परवानगी विना काही मोबाइल अ‍ॅप त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक वापरकर्ते याबाबतच्या तक्रारी करत आहेत. विशेष म्हणजे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड असून गुगल प्ले स्टोरच्या सुरक्षा व्यवस्थेला देखील चकवा देत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. याबाबतचं वृत्त Reddit ने दिलं आहे. रेडिटने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मोबाइल अ‍ॅपचं नाव 'वेदर होम लाइव्ह रडार अलर्ट अँड विजेट' (Weather home- Live Radar Alerts & Widget) असं आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड असून स्वयंचलित पद्धतीने अनेक अँड्रॉइट वापरकर्त्याच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करत आहे. मोबाइल दिसणारी जाहिरात घालण्याचा प्रयत्न केला असता, हे अ‍ॅप स्वयंचलित पद्धतीने मोबाइलमध्ये डाऊनलोड झालं आहे. विशेष म्हणजे वापरकर्त्यांनी डाऊनलोडींग बंद केल्यानंतर देखील, हे अ‍ॅप बॅकग्राउंडला डाऊनलोड झालं आहे. त्यामुळे शेकडो वापरकर्त्यांनी गुगल प्ले स्टोअरकडे तक्रारी केल्या आहेत. हेही वाचा-Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password एका वापरकर्त्याच्या मते, 'संबंधित हवामान संबंधित अ‍ॅप मोबाइलमध्ये स्वयंचलित पद्धतीने इन्स्टॉल होतं आहे. एवढंच नव्हे तर हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर, मोबाइलच्या होम स्क्रिनची लेआउट पूर्णपणे बदलली जात आहे.' तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं की, 'मोबाइलवर दिसलेल्या एका पॉप अप जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर, हे अ‍ॅप माझ्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल झालं आहे. हेही वाचा-सर्वात लवकर हॅक होतात हे 10 Passwords, चुकूनही करू नका वापर याबाबत सॉफ्टवेअर डेव्हलपर्सने प्रतिक्रिया देताना लिहिलं की, तक्रारीची दखल घेतली असून त्याचं निवारण करण्याचं काम सुरू आहे. रेडिट पोस्टनुसार, काही डेव्हलपर्सने दावा केला आहे की, संबंधित अ‍ॅपमध्ये डीएसपी डिजिटल टर्बाइन नावाचं खास तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. त्यामुळे हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरला सहजपणे चकमा देत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या