Alert! बँक खातं रिकामं करणारं APP तुमच्या मोबाइलमध्ये? लगेच करा DELETE

Alert! बँक खातं रिकामं करणारं APP तुमच्या मोबाइलमध्ये? लगेच करा DELETE

तुमच्या नकळत बँक खात्यावरून पैसे काढणाऱं अॅप मोबाइलमध्ये असेल तर लगेच डिलीट करा.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : स्मार्टफोनच्या युगात अनेक कामं चुटकीसरशी होतात. ऑनलाइनमुळे अनेक आर्थिक व्यवहार मोबाईलवरून केले जातात. पण आता अँड्रॉइड युजर्ससाठी एक धोक्याची सूचना आहे. प्ले स्टोअरवर असं अॅप समोर आलं आहे ज्यामुळे युजर्सचे बँक अकाउंट त्याच्या नकळत रिकामं केलं जात आहे. सेक्युअर डी टीमकडून करण्यात आलेल्या नव्या संशोधनात ‘ai.type’अशा नावाचं अॅप सापडलं आहे. जे युजरच्या परवानगीशिवाय प्रीमियन डिजिटल सर्विस खरेदी करते. यामध्ये युजरला प्रीमियम कंटेंट सर्व्हिस खरेदी केल्याचं समजत नाही.

मॅशेबल इंडियाने दिलेल्या वृत्तानुसा सेक्युअर डी टीमने सांगितलं की, हे अॅप बॅकग्राउंडला काम करत होतं. यामध्ये युजरला कोणतीच कल्पना न देता खोट्या जाहिराती दाखवल्या जात असत. त्याचवेळी अॅप डिजिटल खरेदी करत होतं याचे पैसे युजर्सच्या खात्यातून भरले जात होते.

Ai.type हे एक थर्ड-पार्टी keyboard अँड्रॉइड अॅप आहे. जे 4 कोटी युजर्सनी डाऊनलोड केलं आहे. इस्त्रायलमधील कंपनी ai.type LTD ने ते तयार केलं असून त्याचं डिस्क्रिप्शन Free Emoji keyboard असं दिलं आहे.

सेक्युअर डी टीमने सांगितलं की, फसवणुक करून अॅपने आतापर्यंत जवळपास 127 कोटी रुपयांना चुना लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेक्युअर डीने हा प्रयत्न हाणून पाडला. 1 लाखांहून अधिक मोबाईलमधून तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांच्या ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट आली आहे. हे अॅप 13 देशांमध्ये वापरले जाते.

बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटीमुळे प्ले स्टोअरने यावर कारवाई करत अॅप हटवलं होतं. मात्र, ज्या युजर्सनी हे अॅप अनइन्स्टॉल केलं नाही ते जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. युजर्सना सावध करताना हे अॅप अनइन्स्टॉल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

Published by: Suraj Yadav
First published: November 7, 2019, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading