Home /News /technology /

Android युजर्ससाठी मोठी बातमी; फोनमध्ये हे Apps असल्यास त्वरित डिलीट करा, अन्यथा...

Android युजर्ससाठी मोठी बातमी; फोनमध्ये हे Apps असल्यास त्वरित डिलीट करा, अन्यथा...

10 कोटीहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन, ज्यावर धोकादायक अ‍ॅप्स इन्स्टॉल झाले होते, त्याद्वारे हॅकर्स युजर्सचा डेटा लीक करताना आढळले असल्याची माहिती समोर आली आहे.

  नवी दिल्ली, 25 मे : अँड्रॉईड डिव्हाईस युजर्सची (Android Smartphone) प्रायव्हसी पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. 10 कोटीहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन, ज्यावर धोकादायक अ‍ॅप्स इन्स्टॉल झाले होते, त्याद्वारे हॅकर्स युजर्सचा डेटा लीक करताना आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. या धोकादायक अ‍ॅप्सची लीस्ट जाहीर करण्यात आली आहे, यात अनेक पॉप्युलर अ‍ॅप्सचाही समावेश आहे. Check Point Research ने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोकादायक अ‍ॅप्सच्या मदतीने हॅकर्स अँड्रॉईड डिव्हाईसमधून युजर्सची खासगी माहिती गोळा करतात. सर्वात वाईट बाब म्हणजे, लाखो युजर्सचा पर्सनल डेटा रियल टाईम डेटाबेसवर उपलब्ध आहे, जो या अँड्रॉईड अ‍ॅप्सशी लिंक्ड आहे. रिपोर्टमध्ये Check Point Research टीमने काही पॉप्युलर अ‍ॅप्सबाबत माहिती दिली आहे. हे अ‍ॅप्स अ‍ॅस्ट्रोलॉजी, फॅक्स, टॅक्सी सर्विस आणि स्क्रिन रेकॉर्डिंग कॅटेगरीमधील आहे. यात Astro guru, Logo Maker, T'Leva असे अ‍ॅप्स आहेत. T'Leva हे टॅक्ससंबंधित अ‍ॅप 50000 हून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

  (वाचा - हॅकर्सही करू शकणार नाही तुमचं Account Hack, WhatsApp चं भन्नाट फीचर)

  या अ‍ॅप्समुळे पर्सनल डेटा रिस्कमध्ये असतो. या अ‍ॅप्समुळे हॅकर्स युजर्सचा ईमेल, पासवर्ड, नाव, जन्मतारीख, लिंग, डिव्हाईस लोकेशन, प्रायव्हेट चॅट सहजपणे मिळवू शकतात. रिसर्चरला T'Leva अ‍ॅपवर युजर आणि टॅक्सी ड्रायव्हरचं चॅटही अ‍ॅक्सेस करता येत असल्याचं आढळलं. हे सर्व अ‍ॅप्स रियल टाईम डेटाबेसशी कनेक्ट आहेत, त्यामुळे हॅकिंगचा धोका अधिक आहे. T'Leva अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये केवळ एक रिक्वेस्ट सेंड करुन युजर्सची माहिती मिळवली जाते. यावरुन याची सिक्योरिटी कमी कमकुवत आहे, याचा अंदाज लावता येतो.

  (वाचा - Oximeter शिवायच चेक करा ऑक्सिजन लेवल; मोबाईलनेच चेक करता येणार Oxygen Level)

  हॅकर्स या धोकादायक अ‍ॅप्सचं नोटिफिकेशन मॅनेजर अ‍ॅक्सेस करुन युजर्सला थर्ड पार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी सांगतात. युजर्स हे नोटिफिकेशन अ‍ॅप डेव्हलपर्सकडूनच आलेलं आहे असं वाटतं आणि ते अ‍ॅप इन्स्टॉल करतात. त्यामुळे फोनचा डेटा हॅक होतो. त्यामुळे जोपर्यंत या अ‍ॅप्सची सिक्योरिटी वाढवली जात नाही, तोपर्यंत हे अ‍ॅप्स फोनमधून त्वरित डिलीट करा, असं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Android, Smartphone, Tech news

  पुढील बातम्या