स्मार्टफोनमध्ये सर्वात धोकादायक Bug; चेक करा तुमचा मोबाइल सुरक्षित आहे का?

स्मार्टफोनमध्ये सर्वात धोकादायक Bug; चेक करा तुमचा मोबाइल सुरक्षित आहे का?

अँड्रॉइडमध्ये एक असा बग समोर आला आहे ज्यामुळे स्मार्टफोन पूर्ण खराब होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : सध्या मार्केटमध्ये बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांनी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला आहे. यामध्ये अनेक त्रुटी असून सातत्याने त्या समोर येत असतात. आताही एक अशी समस्या समोर आली आहे ज्यामुळे स्मार्टफोन पूर्ण खराब होऊ शकतो. डिसेंबर 2019 मध्ये हा बग फिक्स केला जाण्याची शक्यता आहे. अँड्रॉइडच्या सिक्युरिटी बुलेटिनमध्ये तीन अडचणी असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. यात एक मोठी गडबड असून गूगलने ती सर्वात धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

गुगलने म्हटलं की, अँड्रॉइडमध्ये असलेल्या बगमुळे हॅकर सिंगल मालशिअस मेसेज क्रिएट करू शकत होते. त्यांच्यावर 'Denial of Service' अॅटॅक होऊ शकतो. या बगला 'CVE-2019-2232' असं नाव देण्यात आलं आहे. हा अॅटॅक करण्यासाठी कोणत्याही युजर इंटर अॅक्शनची गरज नाही. यामुळे स्मार्टफोनला मोठं नुकसान होऊ शकतं.

'CVE-2019-2232' चा परिणाम Android 8.0, Android 8.1, Android 9 आणि Android 10 वर होऊ शकतो. या अँड्रॉइड सिस्टीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये हा धोका जास्त आहे. तुमची अँड्रॉइड सिस्टीम कोणती आहे ते चेक करा. यासाठी मोबाइल सेटिंगमध्ये About Phone किवा About Device यावर क्लिक केल्यानंतर Android Version असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच अँड्रॉइड सिस्टीम कोणती आहे ते समजेल. वरीलपैकी अँड्रॉइड सिस्टीम असेल तर तुमच्या फोनचे अपडेट चेक करत रहा. ते आल्यानंतर लगेच अपडेट केल्यानंतर हा बग फिक्स होईल.

अँड्रॉइडने यावर उपाय शोधला असून बग फिक्स केला आहे. तो अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्टला देण्यात आला आहे. युजर्सला मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. लेटेस्ट सिक्युरिटी पॅच युजर्सना मिळण्यासाठी किती वेळ लागेल हे कंपन्यांच्या अप़डेट आणि सिस्टीमवर अवलंबून आहे. सर्वात आधी गुगल पिक्सेल सिरीजच्या डिव्हाइसला सर्वात आधी मिळण्याची शक्यता आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: December 11, 2019, 8:31 AM IST
Tags: android

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading