Home /News /technology /

भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत

भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत

या फोनचे 8 जीबी रॅम व्हेरिएंट ग्राहक आता स्वस्तपणे खरेदी करू शकतात.

    नवी दिल्ली, 26 जुलै : जगातला सगळ्यात जास्त विकला जाणारा अँड्रॉइड (most selling android phone) फोन सॅमसंग गॅलेक्सी ए 51 (samsung Galaxy A51) ची किंमत कमी करण्यात आली आहे. या फोनचे 8 जीबी रॅम व्हेरिएंट ग्राहक आता स्वस्तपणे खरेदी करू शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेला फोन 27,999 रुपयांमध्ये मार्केटमध्ये आला होता, पण आता हा 1 हजार रुपयांना स्वस्त झाला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फोनसाठी फक्त 26,999 रुपये खर्च करावं लागणार आहे. पण गॅलेक्सी ए 51 च्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आलेली नाही. हा फोन फक्त 25,250 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कारण यामधले फिचर ग्राहकांना प्रचंड आवडले आहेत. 2020 च्या पहिल्या तिमाहीत जगातील सर्वाधिक विकला जाणारा Android स्मार्टफोन हा सॅमसंग गॅलेक्सी ए 51 हा होता. म्हणजेच जानेवारी ते मार्च या काळात हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा अँड्रॉइड स्मार्टफोन बनला. एका अहवालानुसार, हा फोन खासकरून युरोप आणि आशिया मार्केटमध्ये खूप विकला गेला आहे. राज्यात आणखी एका जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल, उद्यापासून नियम असे असतील नियम गॅलेक्सी A51 वैशिष्ट्ये स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं तर सॅमसंग गॅलेक्सी ए 51 मध्ये 6.5 इंचाचा सुपर एमोलेड इन्फिनिटी ओ डिस्प्ले आहे. फोनचा पॅनेल एचडी + 2040 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह आहे. कंपनीने हा फोन पंच होल डिस्प्लेसह बाजारात आणला आहे. तर फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. फोटोग्राफी करण्यासाठी, फोनमध्ये मागे चार कॅमेरे आहेत, ज्यात 48-मेगापिक्सलचा पहिला सेन्सर, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5-मेगापिक्सलचा समर्पित डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअप 240fps वर स्लो मोशन व्हिडिओ सपोर्ट आहे. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा फोनमध्ये आहे पावरफुल बॅटरी सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक फीचर आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे. हे ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक प्रिझम क्रश कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येणार आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Samsung, Smartphone

    पुढील बातम्या