मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वर्क फ्रॉम होम होणार आणखी सुरक्षित; Android 12मध्ये असणार बिल्ट-इन VPN

वर्क फ्रॉम होम होणार आणखी सुरक्षित; Android 12मध्ये असणार बिल्ट-इन VPN

येत्या काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणखी सुरक्षित होणार आहे. कारण अँड्रॉईड 12मध्ये लिनक्स केर्नल्समध्ये वायरगार्डचा समावेश केला आहे.

येत्या काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणखी सुरक्षित होणार आहे. कारण अँड्रॉईड 12मध्ये लिनक्स केर्नल्समध्ये वायरगार्डचा समावेश केला आहे.

येत्या काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणखी सुरक्षित होणार आहे. कारण अँड्रॉईड 12मध्ये लिनक्स केर्नल्समध्ये वायरगार्डचा समावेश केला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 27 ऑक्टोबर: आपल्यापैकी अनेक जण अजूनही वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. घरातून काम करणं सुरळीत होण्यासाठी सुरक्षित व्हीपीएन (VPN)ची मागणी वाढली आहे. अनेक लोक त्यांच्या कंपनीच्या सर्व्हरशी दूरस्थपणे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मागणीने वायरगार्डला जन्म दिला. वायरगार्ड म्हणजे आजच्या नव्या युगातील 'व्हीपीएन प्रोटोकॉल' यामुळे युझर्सना दूरस्थ नेटवर्कशी कनेक्ट करत असताना उच्चस्तरीय गोपनीयता, सुरक्षा आणि गती देण्यासाठी अत्याधुनिक क्रिप्टोग्राफी मानकांचा वापर करतो. आता, Google ने Android 12 च्या लिनक्स केर्नल्समध्ये वायरगार्डचा समावेश केला आहे, म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व Android 12 स्मार्टफोन हे व्हीपीएनसह असतील. iOS फोनमध्ये हे आधीपासून उपलब्ध आहे. वायरगार्ड हा एक नवीन व्हीपीएन प्रोटोकॉल आहे. यात 4,000 लाइन्सचा कोड आहे. इतर प्रोटोकॉलच्या तुलनेत जरी यात कमी लाइन्सचा कोड असला तरीही हा नवा व्हीपीएन वेगवान मानला जातो. Android सुद्धा लिनक्सवर आधारित असल्याने Google ने Android 12 लिनक्स केर्नल 5.4 आणि कर्नल 4.19 च्या ट्रीजना जोडून घेऊन वायरगार्डला सपोर्ट दिला आहे. आता गुगलने अलीकडेच अँड्रॉइडच्या कॉमन केर्नलमधील 4.19 ट्री आणि 5.4 ट्रीसोबत अनेक नवे कमिट्स Android 12 जोडले आहेत. यातच वायरगार्ड व्हीपीएन प्रोटोकॉलचा समावेश आहे. टेकरडारने एका लिनक्स केर्नल डेव्हलपरच्या हवाल्याने म्हटलंय की, वायरगार्ड एक सोपा नेटवर्क डिव्हाइस ड्राइव्हर म्हणून Android 12 मध्ये उपलब्ध होणार आहे. प्रत्येक नवीन Android रिलिजसह, Google कित्येक लिनक्स केर्नल्सला समोर आणत आहे. प्रत्येक नवीन Android रिलिजसह, Google कित्येक लिनक्स केर्नल्सला आणत आहे. उदाहरणार्थ, Android 11 लिनक्स केर्नल्स 4.14 आणि 4.19 वापरते. Android 12 कदाचित लिनक्स केर्नल्स 4.19 आणि 5.4 वापर करेल. आताचे फ्लॅगशिप डिव्हाईस जसे लिनक्स कर्नल्स 4.19 वापरतात तसेच Android 12 असणारे फ्लॅगशिप डिव्हाईस हे लेटेस्ट लिनक्स 5.4 वापरतील आणि इतर डिव्हाईस लिनक्स 4.19 चा वापर करतील. परंतु दोन्ही डिव्हाईसेसमध्ये वायरगार्डचा समावेश डीफॉल्ट म्हणून केला जाईल.
First published:

Tags: Technology, Work from home

पुढील बातम्या