आनंद महिंद्रा म्हणाले, माझ्या मोबाईलवर iPhone X पेक्षा जास्त चांगले Photo येतात

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर करताना iphone x चांगले फोटो माझ्या मोबाईलवरून काढता येतात असं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 12:37 PM IST

आनंद महिंद्रा म्हणाले, माझ्या मोबाईलवर iPhone X पेक्षा जास्त चांगले Photo येतात

मुंबई, 17 सप्टेंबर : आठवड्याभरापूर्वी अॅपलने नवी आयफोन सिरीज लाँच केली. या फोनच्या किंमती सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं काही मीम्सदेखील व्हायरल झाली होती. आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून iPhoneX बद्दल त्यांचं मत मांडलं आहे. अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये आनंद महिंद्रा यांनी एक फोटो क्लिक केला आहे. त्यांनी हा फोटो Google Pixel फोनवरून क्लिक केला होता.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, मान्य केलं पाहिजे की, माझ्या गुगल पिक्सलनं काढलेला फोटो iPhone X ने काढलेल्या फोटोपेक्षा भारी आहे. सॅमसंगने यापेक्षा चांगले फोटो काढता येतात असंही ऐकलं आहे.

फोटो शेअर केल्यानंतर ट्विटरवर लोकांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यावर अनेकांनी सॅमसंग फोन चांगला असल्याचं म्हटलं आहे. तर आनंद महिंद्रा यांचे ट्विट शेअर करताना सॅमसंग इंडियाने त्यांना कंपनीचा नव्या फोनबद्दलही सुचवलं आहे.

सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असलेले आनंद महिंद्रा अनेक प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात. तसेच ते व्हायरल होत असलेले व्हिडिओ, फोटोही शेअर करतात.

Loading...

भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...