अवकाशात चमकणारी ही वस्तू आहे तरी काय? NASAने शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल!

अवकाशात चमकणारी ही वस्तू आहे तरी काय? NASAने शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल!

अमेरिकेची अंतराळ संशोधन नासा (NASA) चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी (Chandra X-ray Observatory)च्या लॉन्चिंगनंतर अंतराळातील सर्वात शानदार असा एक फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 ऑगस्ट : अमेरिकेची अंतराळ संशोधन नासा (NASA) चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी (Chandra X-ray Observatory)च्या लॉन्चिंगनंतर अंतराळातील सर्वात शानदार असा एक फोटो शेअर केला आहे. नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावाने पाठवण्यात आलेल्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी या टेलिस्कोपने उच्च ऊर्चा असलेल्या प्रकाशाचा वेध घेतला आहे. नासाने हा टेलिस्कोप 23 जुलै 1999 रोजी लॉन्च केली होती. गेल्या दोन दशकात या टेलिस्कोपने अनेक लाईट इमेज पाठवले. पण कॅसियोपिया A (Cassiopeia A) अर्थात Cas A हा फोटो सर्वोत्तम असा मानला जात आहे. नासाने त्यांच्या इस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

नासाच्या चार मोठ्या ऑब्जर्वेटरीपैकी चंद्र (Chandra X-ray Observatory)ही तिसरी ऑब्जर्वेटरीआहे. चंद्र एक्स-रे मध्ये असलेल्या उच्च दर्जाच्या रिझॉल्यूशन मिररमुळे अन्य एक्स-रे दुर्बिणच्या तुलनेत ती 100 टक्के अधिक संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण एक्स-रे वातावरण शोषूण घेतात. त्यामुळेच पृथ्वीवरील दुर्बिणमुळे एक्स-रेचा शोध लागत नाही. यासाठी दुर्बिण अंतराळात पाठवावी लागते. या गरजेतूनच चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी अंतराळात पाठवण्यात आली होती. ही ऑब्जर्वेटरी 2019पर्यंत कार्यरत राहणार आहे.

कॅसियोपिया A हे पृथ्वीपासून जवळपास 11 हजार प्रकाश वर्ष दूर आहे. अब्जावधी तारे चमकत असल्यासारखे दिसत आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा ताऱ्यांमध्ये प्रज्वलनासाठी इंधन संपते तेव्हा ते परस्परांना धडक देतात. या प्रक्रियेत जो तारा शिल्लक राहतो त्याचे द्रव्यमान सूर्यापेक्षा 1.4 टक्क्यांनी कमी असते आणि आकार पृथ्वीच्या बरोबर असतो. यालाच सुपरनोव्हा असे म्हटले जाते. सुपरनोव्हाला अंतराळातील सर्वात तेजस्वी तारा मानले जाते. पण त्याचा कोणताही ऐतिहासिक रेकॉड नाही. कॅसियोपिया Aचा फोटो शेअर करताना नासाने म्हटले आहे की, 20 वर्षापूर्वी आजच्या दिवशीच चंद्रने कॅसियोपिया Aचा पहिला लाईट इमेज पाठवला होता. त्यानंतर दोन शतकानंतर हा फोटो शेअर केला आहे.

गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

First published: August 28, 2019, 4:45 PM IST
Tags: nasa

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading