मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone, iPad आणि Airpods Pro अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा, किती पैसे वाचतील?

iPhone, iPad आणि Airpods Pro अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा, किती पैसे वाचतील?

अॅमेझॉनच्या सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन, अ‍ॅपल आयपॅड, अ‍ॅपल एअरपॉड या उत्पादनांवर या सेलमध्ये किती सवलत मिळणार आहे, याबद्दल जाणून घेऊ या.

अॅमेझॉनच्या सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन, अ‍ॅपल आयपॅड, अ‍ॅपल एअरपॉड या उत्पादनांवर या सेलमध्ये किती सवलत मिळणार आहे, याबद्दल जाणून घेऊ या.

अॅमेझॉनच्या सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन, अ‍ॅपल आयपॅड, अ‍ॅपल एअरपॉड या उत्पादनांवर या सेलमध्ये किती सवलत मिळणार आहे, याबद्दल जाणून घेऊ या.

मुंबई, 9 ऑगस्ट : अ‍ॅपल कंपनीची (Apple) उत्पादनं बरीच लोकप्रिय आहेत; मात्र ती बरीच महागडीही आहेत. त्यामुळे सहजासहजी कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक जण काही विशेष ऑफर किंवा सेलची वाट पाहत असतात. असाच एक विशेष सेल जाहीर करण्यात आला असून, त्यात अ‍ॅपल कंपनीची इलेक्ट्रॉनिक उपकरणं सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनवर स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रेट फ्रीडम सेल (Amazon Great Freedom Sale) सुरू आहे. हा सेल 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या सेलमध्ये अ‍ॅपल कंपनीची उत्पादनं सवलतीत खरेदी करण्याची संधी इच्छुकांनी वाया घालू नये. अ‍ॅपल आयफोन, अ‍ॅपल आयपॅड, अ‍ॅपल एअरपॉड या उत्पादनांवर या सेलमध्ये किती सवलत मिळणार आहे, याबद्दल जाणून घेऊ या. Apple 10.2 इंच iPad (2021 मॉडेल) : अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा आयपॅड 27,900 रुपयांत खरेदी करता येणार आहे. त्याची मूळ किंमत 32,900 रुपये एवढी आहे. म्हणजेच तब्बल 5 हजार रुपयांची सवलत यावर मिळणार आहे. अ‍ॅपल आयपॅडमध्ये A13 बायोनिक चिपसेट असून, त्यात स्टिरिओ स्पीकर्स आहेत. आयपॅडमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Apple iPad Mini (2021) : हा आयपॅड सेलमध्ये 46,900 रुपयांत उपलब्ध केला जाणार आहे. आयपॅड मिनीमध्ये iOS 15 ही ऑपरेटिंग सिस्टीन आहे. त्यात 8.3 इंच आकाराचा रेटिना डिस्प्ले आहे. यामध्ये अ‍ॅपल कंपनीने स्वतः विकसित केलेला A15 बायोनिक चिपसेट आहे. Smartphone Tips मोबाईल पाण्यात पडल्यावर त्वरित करा ‘हे’ काम, नाहीतर... Apple iPhone 12 : हा आयफोन या सेलमध्ये 65,900 रुपयांऐवजी केवळ 52,900 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या आयफोनमध्ये 6.1 इंच आकाराचा डिस्प्ले असून, त्यात ड्युएल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. Apple iPhone 11 : अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा आयफोन केवळ 49,900 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्याची मूळ किंमत 54,900 रुपये एवढी आहे. या फोनला 6.1 इंच आकाराचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असून, 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5G Network: नवीन फोन घ्यायची गरज नाही, तुमच्या 4G फोनमध्येही मिळू शकतं फास्ट इंटरनेट
 Apple Airpods Pro : अ‍ॅमेझॉन सेलमध्ये एअरपॉड प्रो 17,990 रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहेत. या उत्पादनाची मूळ किंमत 24,900 रुपये आहे. एअरपॉडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइझ कॅन्सलेशन आणि अ‍ॅडाप्टिव्ह EQ अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
Apple AirTag : एअरटॅगची मूळ किंमत 3190 रुपये आहे. या सेलमध्ये केवळ 3100 रुपये किमतीत एअरटॅग खरेदी करता येणार आहे. एअरटॅगमध्ये बिल्ट-इन स्पीकर असतो. शिवाय हे उपकरण 'सिरी'शी कम्पॅटिबल आहे.
First published:

Tags: Amazon, Iphone, Tech news

पुढील बातम्या