मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Prime: कंपनीचा सर्वात स्वस्त Subscription Plan बंद, हे आहे कारण

Amazon Prime: कंपनीचा सर्वात स्वस्त Subscription Plan बंद, हे आहे कारण

कंपनीच्या या घोषणेनंतर आता Amazon Prime चा 129 रुपयांचा सब्सक्रिप्शन प्लॅन युजर्सला उपलब्ध होणार नाही.

कंपनीच्या या घोषणेनंतर आता Amazon Prime चा 129 रुपयांचा सब्सक्रिप्शन प्लॅन युजर्सला उपलब्ध होणार नाही.

कंपनीच्या या घोषणेनंतर आता Amazon Prime चा 129 रुपयांचा सब्सक्रिप्शन प्लॅन युजर्सला उपलब्ध होणार नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 16 मे : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने आपला सर्वात स्वस्त मंथली सब्सक्रिप्शन प्लॅन (Monthly Subscription Plan) बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर आता Amazon Prime चा 129 रुपयांचा सब्सक्रिप्शन प्लॅन युजर्सला उपलब्ध होणार नाही.

फ्री सर्विस बंद -

Amazon कंपनीने आपल्या सपोर्ट पेजवर या बदलांची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Amazon Prime मंथली सब्सक्रिप्शन बंद करत आहे. त्यासह नव्या मेंबर्सला फ्रीमध्ये दिली जाणारी ट्रायल सर्विसही बंद करण्यात आली आहे. कंपनीने 27 एप्रिल 2021 रोजी नव्या मेंबर्ससाठी मोफत साइन-अप करण्याची सुविधा बंद केली आहे.

Amazon Prime कडून 129 रुपयांचा प्लॅन बंद करण्यात आल्यानंतर आता युजर्ससाठी स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन रुपात 329 रुपयांचा तीन महिन्यांचा रिचार्ज प्लॅन आहे. त्याशिवाय 999 रुपयांत वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनही घेता येईल.

(वाचा - ऑर्डर केलं माउथवॉश आणि डिलीव्हरीवेळी आला 13000चा स्मार्टफोन, पाहा पुढे काय झालं)

मिळालेल्या माहितीनुसार, Amazon Prime ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमामुळे हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने बँकासाठी ऑटो डेबिटसाठी नव्या नियमांचं पालन करण्यासाठीची डेडलाईन वाढवून 30 सप्टेंबर 2021 केली आहे. या अंतर्गत अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन (AFA) अर्थात वेरिफिकेशनसाठी अतिरिक्त उपायांना आता कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे.

(वाचा - घाईगडबडीत हे 5 बनावट CoWin वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करू नका, सरकारचा इशारा)

या अंतर्गत कार्ड किंवा प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूंमेंट (PPI) किंवा UPI चा वापर करताना AFA चं पालन करणं गरजेचं आहे. परंतु असं होताना दिसत नाही. त्यामुळे RBI ने नियम बनवून AFA चं पालन न झाल्यास, ही सुविधा 30 सप्टेंबर 2021 पासून जारी होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अ‍ॅमेझॉनने भारतात एक नवी miniTV व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्विस लाँच केली आहे. ही सर्विस भारतात दाखल करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसांत ही सर्विस iOS आणि मोबाईल वेबमध्ये उपलब्ध केली जाईल.

First published:

Tags: Amazon, Amazon subscription, Tech news