Amazonवर 9 लाखांचा कॅमेरा 6 हजार 500 रुपयांत, लोक म्हणाले 'थँक्यू बेजोस'

Amazonवर 9 लाखांचा कॅमेरा 6 हजार 500 रुपयांत, लोक म्हणाले 'थँक्यू बेजोस'

Amazonच्या प्राइम सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : अॅमेझॉनने प्राइम डे सेल मध्ये भरघोस डिस्काउंट दिला होता. 15 आणि 16 जुलैला झालेल्या सेलमध्ये भारतातच नाही तर जगभरात खरेदी करण्यात आली. यात एका चुकीचा फायदा ग्राहकांनी घेतला. 9 लाख रुपयांच्या कॅमेरा लेन्सची किंमत 6 हजार 500 रुपये ठेवली होती. लोकांनी इतकी सूट मिळते पाहून खरेदी केली.

कंपनीला जेव्हा ही चूक लक्षात आली त्यांनी लगेच दुरुस्त केली. मात्र, त्यापूर्वी अनेकांनी याची खरेदी केली होती. त्यानंतर लोकांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांचे आभार मानले आहेत. याशिवाय लोकांनी अॅमेझॉनचं कौतुकही केलं आहे. आता प्रश्न हा आहे की, कंपनी खरेदी करण्यात आलेल्या कॅमेऱ्याची लेन्स ग्राहकांना देणार की नाही ? लोकांनी कॅननची EF 800mm f/5.6L IS लेन्स खरेदी केली आहे.

कॅननच्या या लेन्सची किंमत प्रत्यक्षात 9 लाख रुपये आहे. अॅमेझॉनवर ती 6 हजार 500 रुपयांत उपलब्ध होती. काही वेळातच ही चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने त्यात दुरुस्ती केली.

एका व्यक्तीने म्हटलं की, मी प्राइम डे सेलमध्ये 3 हजार डॉलरचा कॅमेरा फक्त 94 डॉलरमध्ये खरेदी केला. तुम्हाला काय वाटतं तो कॅमेरा मला मिळेल का? कारण ती एक तांत्रिक चूक होती आणि नंतर दुरुस्त करण्यात आली.

VIDEO : प्रसिद्ध अमेरिकी टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या 'या' गाण्यानं धम्माल

VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या