• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • पुन्हा एकदा Amazon चा बंपर सेल; फोन, लॅपटॉप, स्मार्ट TV वर मिळेल डिस्काउंट, या बँक कार्ड्सवर मिळतील ऑफर्स

पुन्हा एकदा Amazon चा बंपर सेल; फोन, लॅपटॉप, स्मार्ट TV वर मिळेल डिस्काउंट, या बँक कार्ड्सवर मिळतील ऑफर्स

Amazon ने दुसऱ्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, अ‍ॅक्सेसरीज, इयरफोन, टॅबलेट आणि इतर उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीजन सुरू झाल्यानंतर अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्सकडून (e-commerce websites) सेलचा धमाका सुरू होतो. या सेलमध्ये अनेक गॅजेट्स स्वस्तात मिळत असल्याने हे सेल म्हणजे ग्राहकांसाठी पर्वणीच असते. आता अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्सनी फेस्टिव्हल सेल (festival sale) जाहीर केले आहेत. या सेलमध्ये गॅजेट्स (gadgets) स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Amazon India नेही द ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची (The Great Indian Festival Sale) सुरूवात केली आहे. Amazon ने याआधीच पहिला सेल आणला होता. आता Amazon ने दुसऱ्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, अ‍ॅक्सेसरीज, इयरफोन, टॅबलेट आणि इतर उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा इतर कोणतंही गॅजेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी असेल. Amazon ने आपल्या ग्राहकांना बँक ऑफरमध्ये सूट दिली आहे. कंपनीने ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स देण्यासाठी सिटी बँक, अमेरिकन एक्सप्रेस आणि रुपे कार्डबरोबर भागीदारी केली आहे. याशिवाय, विविध ब्रँडेड उत्पादनांसाठी एक्सचेंज ऑफरवर 25 हजार रुपयांपर्यंत सूट देखील दिली जात आहे.

Flipkart ने iPhone 12 ऐवजी पाठवला साबण, VIDEO पाहून व्हाल हैराण

Amazon वर सिटी बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड EMI आणि डेबिट कार्ड वापरून 1750 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट ग्राहक मिळवू शकतात. ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत असेल. याशिवाय RBL बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वापरून तुम्ही 1750 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट मिळवू शकता. ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालू राहील. तसंच, अमेरिकन एक्सप्रेस कार्डचा वापर करूनही 1750 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट मिळू शकते. ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे. एवढंच नाही तर तुम्ही RuPay क्रेडिट कार्ड वापरून 500 रुपयांपर्यंत आणि डेबिट कार्ड वापरल्यावर 150 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत असणार आहे.

Fake Mobile App मुळे तुमच्या बँक अकाउंटला धोका, असं तपासा App खरं की खोटं?

Amazon ने आपल्या पहिल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सर्वोत्कृष्ट फोनवर अनेक ऑफर दिल्या होत्या, सेलमधील प्रत्येक सेगमेंटच्या फोनवर असलेल्या ऑफर्समध्ये ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळाली होती. या सेलमधील सर्वोत्कृष्ठ ऑफरमध्ये ग्राहकांना मध्यम रेंजमधील iQOO Z3 या स्मार्टफोनवर चांगली सूट मिळाली होती.
First published: