• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • JBL, Boat सारख्या कंपनीचे ब्लूटूथ इअरफोन्सची जबरदस्त ऑफर, 1 हजारापेक्षा कमी किंमतीत Amazonवर उपलब्ध

JBL, Boat सारख्या कंपनीचे ब्लूटूथ इअरफोन्सची जबरदस्त ऑफर, 1 हजारापेक्षा कमी किंमतीत Amazonवर उपलब्ध

इअरफोन्स खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) हा अतिशय चांगला पर्याय आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: आजकालची तरुण पिढी घराबाहेर पडताना फोन आणि इयरफोन्स या दोन गोष्टी न चुकता घेऊन जाते. सध्या विविध प्रकारच्या आणि कंपन्यांच्या ब्लूटूथ इयरफोन्सची (Bluetooth Earphones) चलती आहे. तुम्हालादेखील अशा प्रकारचे इअरफोन्स खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) हा अतिशय चांगला पर्याय आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येतं. या वर्षीदेखील अ‍ॅमेझॉननं 2 ऑक्टोबरपासून प्राइम ग्राहकांसाठी आणि 3 ऑक्टोबरपासून नॉन-प्राइम ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर्स सुरू केल्या आहेत. यामध्ये अनेक कंपन्यांच्या उत्पादनांवर चांगल्या ऑफर्स आहेत. जेबीएल (JBL), बोट (BOAT) यांसारखे टॉप ब्रँड्स आणि इतर अनेक कंपन्या त्यांच्या ब्लूटूथ इयरफोन्सवर मोठी सवलत देत आहेत. तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले ब्लूटूथ इयरफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. कारण, अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ब्लूटूथ इयरफोन्स उपलब्ध आहेत. यातल्या काही सर्वोत्तम ऑफर्सची माहिती तुमच्यासाठी देत आहोत. हेही वाचा-  Xiaomi च्या फोनमधून फोटो काढून 3 लाख जिंकण्याची संधी, असं करा अप्लाय आणि जिंका बंपर गिफ्ट्स पीट्रॉन टँजंटबीट पीट्रॉन टँजंटबीट (Ptron tangentbeat) हा एक लाइटवेट ब्लूटूथ इयरफोन आहे. हा नेकबँड डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. या ब्लूटूथ इयरफोनमध्ये शानदार नॉइज कॅन्सलेशन फिचर आहे असून, यात 10 मिमीच्या डायनॅमिक ड्रायव्हरचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं संगीताचा आस्वाद घेता येतो. या इयरफोनला IPX4 रेटिंग आहे. त्यामुळे पाण्याचे तुषार किंवा घाम यांपासून तो सुरक्षित राहतो. याचा बॅटरी बॅकअप 8 तासांचा आहे. पीट्रॉन टँजंटबीटच्या मूळ किमतीवर 1900 रुपयांची सूट मिळत असल्यानं तो फक्त 599 रुपयांना मिळत आहे. जेबीएल इन्फिनिटी ग्लाइड 120 (JBL Infinity Glide 120) ग्लाइड 120 हा जेबीएल ब्लूटूथ इयरफोन इन्फिनिटी प्रकारातला आहे. हा इयरफोन 12 मिमी ड्रायव्हरसह येतो. या इयरफोनमध्ये ड्युएल इक्वॅलायझर मोड आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा बास आउटपुट नियंत्रित करू शकता. हा ब्लूटूथ इयरफोन IPX5 रेटिंगचा असल्यानं तो जलरोधक आहे. 7 तासांचा बॅटरी बॅकअप असलेल्या या इयफोनवर सध्या 2100 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळं सध्या त्याची किंमत 899 रुपयांवर आली आहे. हेही वाचा-  Google Chrome चा वापर करता? लगेच करा हे महत्त्वपूर्ण काम, अन्यथा बसेल मोठा फटका बोट रॉकर्झ 255 बोटचा 'द बोट रॉकर्झ 255' (Boat Rockerz 255) हासुद्धा एक उत्तम इयरफोन आहे. यामध्ये एचडी साउंड आणि डीप बासच्या सुविधा आहेत. याशिवाय, या इयरफोनमध्ये कंट्रोल फीचर आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही आवाज कमी-जास्त करू शकता, व्हॉइस अस्टिस्टंट नियंत्रित करू शकता, तसंच कॉलला उत्तरदेखील देऊ शकता. हे इयरफोन मॅग्नेटिक इयरबड्ससह (Magnetic earbuds) येतात. त्यामुळं तुम्ही त्यांना तुमच्या सोयीनुसार अॅडजस्ट करू शकता. याचा बॅटरी बॅकअप 9 तासांचा आहे. 2191 रुपये सूट मिळत असल्यानं बोट रॉकर्झ 255 सध्या 799 रुपयांना मिळत आहेत. बोल्ट ऑडिओ प्रोबास कर्व्ह प्रो (Boult Audio ProBass CurvePro) हा ब्लूटूथ इयरफोन 60 अंशांच्या नोजल अँगलसह येतो. याचा आकार अंडाकृती असून यात नॉइज आयसोलेशन सुविधा आहे. यातील इन-बिल्ट मायक्रो वूफरमुळं तुम्हाला उत्तम बासचा अनुभव मिळतो. IPX5 रेटिंग असलेला हा इयरफोन वॉटर रेझिस्टंट आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी त्याला फक्त दीड तासाचा कालावधी लागतो. एकदा चार्ज केल्यानंतर हा 12 तास चालू शकतो. बोल्ट ऑडिओ प्रोबास कर्व्ह प्रोवर 4100 रुपयांची भरघोस सूट मिळत असल्यानं सध्या त्याची किंमत 899 रुपये झाली आहे. हेही वाचा-  पुन्हा FB-WhatsApp ठप्प झालं तर? हे आहेत Best पर्याय, नाही तुटणार जगाशी संपर्क वरील इयरफोन्सशिवाय इतर कंपन्यादेखील आपल्या उत्पादनांवर भरघोस सूट देत आहेत. त्यामुळे तुम्ही येत्या काही दिवसांत इयरफोन्स किंवा ब्लूटूथ इयरफोन्स घेण्याचा विचार करत असाल, तर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला जरूर भेट द्या.
Published by:Pooja Vichare
First published: