मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Amazon च्या स्थापनेला 27 वर्षं; जेफ बेझॉस या दिवशी सोडणार CEO पद

Amazon च्या स्थापनेला 27 वर्षं; जेफ बेझॉस या दिवशी सोडणार CEO पद

5 जुलै 1994 रोजी जेफ बेझॉस यांनी अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. आता 27 वर्षांनी त्याच दिवशी ते कंपनीच्या प्रमुख पद सोडणार आहेत.

5 जुलै 1994 रोजी जेफ बेझॉस यांनी अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. आता 27 वर्षांनी त्याच दिवशी ते कंपनीच्या प्रमुख पद सोडणार आहेत.

5 जुलै 1994 रोजी जेफ बेझॉस यांनी अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. आता 27 वर्षांनी त्याच दिवशी ते कंपनीच्या प्रमुख पद सोडणार आहेत.

    नवी दिल्ली, 27 मे : अ‍ॅमेझॉनचे (Amazon) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनी आपण सीईओ पद कधी सोडणार तो दिवस जाहीर केला आहे. 5 जुलै 2021 रोजी जेफ बेझॉस आपलं पद सोडणार आहेत. त्यानंतर हे पद अ‍ॅमेझॉनचे एक्झिक्युटिव्ह अँडी जेसी (Andy Jessy) सांभाळणार आहेत. इंटरनेटवर काही पुस्तकं विकण्यापासून सुरू केलेली ही कंपनी आज जगप्रसिद्ध आहे. त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.

    5 जुलै 1994 रोजी जेफ बेझॉस यांनी अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. आता 27 वर्षांनी त्याच दिवशी ते कंपनीच्या प्रमुख पद सोडणार आहेत. बुधवारी, 26 मे रोजी बेझॉस यांनी कंपनीच्या शेअरहोल्डर्सना ही माहिती दिली. ही घोषणा करताना ते भावुक झाले होते.

    बेझॉस अर्थ फंड, ब्लू ओरिजिन स्पेसशिप कंपनी, अ‍ॅमेझॉन डे वन फंड आणि दी वॉशिंग्टन पोस्ट या आपल्या अन्य उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.

    अँडी जेसी अ‍ॅमेझॉन कंपनीचे नवे सीईओ होतील, असं बेझॉस यांनी फेब्रुवारीतच जाहीर केलं होतं. अँडी जेसी यांनी 1997 मध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीत आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए (MBA) केलं आहे, अशी माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची सुरुवातही त्यांनीच केली. त्यानंतर त्याला क्लाउड प्लॅटफॉर्मचं स्वरूप दिलं. आज लाखो ग्राहक ही सेवा वापरत आहेत. अँडी जेसी यांच्याकडे सध्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या कोणाकडे दिल्या जाणार, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

    (वाचा - 'निराधार बोलणं थांबवावं आणि...', Twitter च्या वक्तव्यावर केंद्राचं सडेतोड उत्तर)

    जेफ बेझॉस पुन्हा एकदा जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सध्या त्यांचं नेटवर्थ 188.4 अब्ज डॉलर एवढं आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत आलेल्या तेजीमुळे बेझॉस यांच्या नेटवर्थमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत त्यांचं नेटवर्थ सुमारे 186 अब्ज डॉलर एवढं होतं.

    (वाचा - खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल, मेसेज चेक करणार?वाचा त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य)

    अलीकडेच जेफ बेझॉस आणि पत्नी मॅकेंझी स्कॉट यांचा घटस्फोट झाला. 25 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मॅकेंझी या अ‍ॅमेझॉनमधल्या पहिल्या कर्मचारी होत्या. सुमारे 25 लाख कोटी रुपयांची पोटगी जेफ यांनी मॅकेंझी यांना दिली. या घटस्फोटाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.

    First published:
    top videos

      Tags: Amazon, Tech news