Home /News /technology /

Amazonवर सुरु झाला Appleचा मेगा सेल, सर्वात कमी किंमतीत मिळणार iPhone 11

Amazonवर सुरु झाला Appleचा मेगा सेल, सर्वात कमी किंमतीत मिळणार iPhone 11

सध्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे दुकानांमध्ये लोकांची गर्दी कमी आहे. लोक जास्त बाहेर निघत नाहीत. त्यामुळे लोकांना पुन्हा खरेदीकडे वळविण्यासाठी असे मेगा सेल्स जाहीर केले जात आहेत.

  मुंबई 19 जुलै: लॉकडाऊनच्या काळात महागडा Appleचा फोन आणि इतर वस्तू घेणं शक्य वाटत नसेल तर आता चांगली संधी आली आहे. Amazonवर मोठा सेल सुरु झाला आहे. त्यात तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड्सचा फोन आणि इतर वस्तू घेता येणार आहेत. शनिवार (18 जुलै)च्या रात्री 12 पासून ते 25 जुलैपर्यंत हा सेल (Apple Days Sale)  चालणार आहे. iPhone 11 श्रेणी, Apple वॉच, MacBookवर सर्वात उत्तम ऑफर देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. iPhone 11 श्रेणीतले मोबाईल्स आत्तापर्यंतच्या सगळ्यात कमी किंमतींमध्ये मिळणार आहेत. या सेलमध्ये iPhone 11 62,900 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर HDFC Bankच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max वर 4,000 रुपयांची सुट मिळणार आहे. त्याचबरोबर Appleच्या  iPadवरही 4,000 रुपयांची सुट मिळणार आहे. या सेलमध्ये iPhone 8 प्लसच्या 64GBच्या फोनवर 500 रुपयांची सूट मिळेल. हा फोन 41,500 रुपयांना मिळणार आहे तर iPhone 7 सीरीजचे फोनही आकर्षक किंमतींमध्ये मिळणार आहे. Appleच्या जवळपास सर्वच फोन्सवर काही तरी सुट मिळणार आहे. EMIसाठी आकर्षक पर्याय, नो कॉस्ट EMI, HDFCच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यावरही सुट दिली जाणार आहे. Apple iPads वर 5,000 रुपयांपर्यंत सुट मिळेल. त्याचबरोबर Apple Watch Series 3 साठी HDFCच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला तर 1,000 रुपयांची सुट मिळणार आहे. आता गाड्यांना लावावी लागणार हिरव्या रंगाची नंबर प्लेट, स्टिकरही असणार! सध्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे दुकानांमध्ये लोकांची गर्दी कमी आहे. लोक जास्त बाहेर निघत नाहीत.  फोन्स आणि इतर वस्तूंची खरेदीही कमी झाली आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा खरेदीकडे वळविण्यासाठी असे मेगा सेल्स जाहीर केले जात असून त्यावर घसघसशीत सुटही मिळणार आहे. आता मीटिंगमध्ये मिळणार 3D अनुभव! जाणून घ्या JioGlass चे खास फिचर्स आयफोन वापरण हे सगळ्यांनाच आवडतं मात्र जास्त किंमतीमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे अशा सेल्सच्या माध्यमातून हा फोन घेता येऊ शकतो.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Apple

  पुढील बातम्या