नवी दिल्ली, 8 मे : किंडल हा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनचा
(Amazon) टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे. किंडल हे एक ई-रीडर आहे, ज्यावर तुम्ही पुस्तकं, मॅगझिन्स, पेपर आणि इतर कोणताही कंटेंट वाचू शकता. काही दिवसांपासून किंडल डिव्हाइस खरेदी न करताही अँड्रॉइड डिव्हाइसवर पुस्तकांचं किंडल
(Kindle) वर्जन घेता येत होतं. परंतु आता असं करता येणार नाही.
Amazon App वर युजर अँड्रॉइड डिव्हाइससाठी कोणत्याही पुस्तकाचं किंडल वर्जन डाउनलोड करू शकत होते. परंतु आता Amazon ने हा पर्याय काढून टाकला आहे. आता पुस्तकांचं किंडल वर्जन केवळ किंडल डिव्हाइसवरच मिळेल. हे किंडल वर्जन आधीप्रमाणे अँड्रॉइड डिव्हाइसवर वाचता येणार नाही.
आता जर युजर अँड्रॉइड डिव्हाइसवर एक किंडल बुक खरेदी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला नव्या स्क्रिनवर नेलं जाईल. इथे तुम्ही अँड्रॉइड डिव्हाइसवर किंडल बुक खरेदी करू शकत नसल्याचं लिहिलेलं दिसेल. iOS युजर आधीपासूनच आपल्या डिव्हाइसवर Amazon App द्वारे किंडल बुक डाउनलोड करू शकत नव्हते.
ज्यावेळी तुम्ही हा पर्याय निवडण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळी डिव्हाइसच्या स्क्रिनवर एक मेसेज दिसेल. त्या मेसेजमध्ये गुगल प्ले स्टोरच्या पॉलिसीमुळे नवा कंटेंट खरेदी करता येणार नाही असं सांगितलं जाईल. त्यानंतर App वर रीडिंग लिस्ट तयार करावी लागेल आणि त्यानंतर Amazon वेबसाइटवर ते खरेदी करावं लागेल.
Amazon वर किंडल बुक्स कसे खरेदी कराल?
- सर्वात आधी amazon.com वर क्लिक करा आणि मेन्यू ओपन करा.
- kindle e readers and e-books पर्याय निवडा.
- किंडल बुक स्टोरमध्ये तुमच्या आवडीचं पुस्तक निवडा आणि Buy Now वर क्लिक करा. हे खरेदी करण्यासाठी तुमच्या Amazon Pay Account मध्ये पैसे असणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.