Home /News /technology /

Tata Motors Price Hikes : टाटाच्या सगळ्याच कार महाग होणार; कंपनीने दिलं 'हे' कारण

Tata Motors Price Hikes : टाटाच्या सगळ्याच कार महाग होणार; कंपनीने दिलं 'हे' कारण

Tata Motors ने 2022 मध्ये कारच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने यापूर्वी जानेवारीमध्ये आपल्या कारच्या एकूण किमतींमध्ये सरासरी 0.9 टक्क्यांची वाढ केली होती.

    मुंबई, 23 एप्रिल : नवीन कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला आता जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. टाटा मोटर्सने (Tata Motors) शनिवारी आपल्या प्रवासी कारच्या किमतीत वाढ केल्याची घोषणा केली. नवीन दरवाढ इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने केली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. दरवाढ 23 एप्रिल म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. व्हेरिएंट आणि मॉडेलच्या आधारावर एकूण किंमती सुमारे 1.1 टक्के वाढल्या आहेत. टाटा मोटर्सने सर्व मॉडेल्सच्या (Tata Cars) किमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे, परंतु कंपनीने कोणतीही तपशीलवार किंमत यादी जारी केलेली नाही. मात्र 2022 मध्ये टाटाने कारच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने यापूर्वी जानेवारीमध्ये आपल्या कारच्या एकूण किमतींमध्ये सरासरी 0.9 टक्क्यांची वाढ केली होती. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल इलेक्ट्रिक कार विकण्यात टाटा आघाडीवर कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Tata Electric Vehicles) मागणीत वाढ होताना दिसत आहे. टाटाची Nexon EV ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार देखील आहे. टाटा मोटर्सने अलीकडेच ग्राहकांना एका दिवसात 101 इलेक्ट्रिक गाड्यांची विक्रमी डिलिव्हरी नोंदवली. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान टाटा मोटर्सने या इलेक्ट्रिक कार ग्राहकांना दिल्याचे सांगितले. खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे एप्रिलमध्ये 65 हजार रुपयांची सवलत Tata Motors एप्रिल महिन्यात आपल्या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ग्राहक Tiago, Tigor, Harrier आणि Safari मधून निवड करू शकतात, जे सर्व एक्सचेंज बोनस, रोख ऑफर आणि कॉर्पोरेट रिवॉर्डसह येतात. ही ऑफर 2021 आणि 2022 या दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. लवकरच तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार Tata Motors ने अलीकडेच नवीन Curvv इलेक्ट्रिक SUV कॉन्सेप्ट कार आणणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने 2026 पर्यंत पोर्टपोलिओमध्ये 10 इलेक्ट्रिक गाड्याचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. पुढील 2 वर्षात कंपनी 3-4 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करणार आहे. टाटा मोटर्सने 2023 पर्यंत सध्याचे ICE मॉडेलवर आधारित 2 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Ratan tata, Tata group

    पुढील बातम्या